राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद शाखातर्फे सुतारपार गल्लीतील प्राचीन दक्षिणमुखी मारुती मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
मंगळवारी कै. इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील यांच्या वाड्यातील व दीडशे वर्षांपूर्वी लाकडावर घडविलेल्या श्रीराम मूर्तीची वेदंमत्रात पूजाअर्चा करण्यात आली. उत्सव यशस्वितेसाठी माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर पाटील, नगरसेवक प्रकाश वानोळे, ब्राह्मण सभा पंचकमेटी सदस्य महेश जोशी, प्रदेश संघटनमंत्री राजेश जोशी, मराठवाडा उपाध्यक्ष शाम पंजवानी, मराठवाडा महामंत्री सुप्रिया जोशी, तालुका अध्यक्ष नम्रता पटेल, अश्विनी लखमले, मराठवाडा अध्यक्ष कीर्ती शिवपुरी, दारुबंदी अधिकारी जयवंत पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कल्याण बरकसे आदी भाविक भक्तांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद प्रवक्ते सुयश शिवपुरी यांनी केले. तसेच बालाजी मंदिरातील प्राचीन राम मूर्तीचा अभिषेक करून पोरवाल बंधू, धनराज चितलांगी, अमित नागोरी, लालू जव्हेरी, दिनेश पारीख, तुकाराम बडसल आदींच्या उपस्थितीत उत्सव साजरा झाला. यासह गावातील नाथमंदिरात, अमृतराय महाराज मठात जोगेश्वरी संस्थान जायकवाडी, हनुमान टेकडीवरील राम मंदिर, औरंगाबाद रोडवरील राम मंदिरासह विविध मठ मंदिरात व रामभक्तांनी घरोघरी प्रभु श्रीरामचंद्र जन्मोत्सव साजरा केला.