औरंगाबाद : शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शहरातील शाकंभरी देवीच्या मंदिरात भाज्या, फळांनी सजावट करण्यात आली होती.
चाणक्यपुरी मागील रामतारा हाऊसिंग सोसायटीत शाकंभरी देवीचे मंदिर आहे. शाकंभरी पौर्णिमेला देवीचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत असतो. यानिमित्त मंदिरात सकाळपासून भाविक दर्शनासाठी येत होते. देवीच्या मंदिरात भाज्या, फळे व फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवीच्या मूर्तीला भरजरी वस्त्रांनी सजविण्यात आले होते. सजावट लक्षवेधी ठरली. सकाळी अभिषेकाने जन्मोत्सवाला सुरुवात झाली. सायंकाळी देवीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यात शाकंभरी मंगलपाठ करण्यात आला. कन्यापूजन करण्यात आले. छप्पनभोग ठेवण्यात व सामूहिक आरती करण्यात आली. ज्या भाविकांनी मास्क लावले. त्यांनाच दर्शनासाठी मंदिरात पाठविण्यात येत होते. सॅनिटायझर लावण्यात येत होते. उत्सव यशस्वीतेसाठी शाकंभरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कॅप्शन
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त रामतारा हाऊसिंग सोसायटीत शाकंभरी देवीच्या मंदिरात अशी भाज्या, फळांनी करण्यात आलेली सजावट लक्षवेधी ठरली.