शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीटीव्ही’, सुरक्षारक्षक असूनही औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालय व बसस्थानकाची सुरक्षा वार्‍यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 15:10 IST

घाटी रुग्णालय आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह सुरक्षारक्षक तैनात आहेत. तरीही या दोन्ही ठिकाणांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांतील घटनांनी आला. या दोन घटनांमुळे किमान यापुढे खबरदारी घेतली जाईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांक डून व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालय आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह सुरक्षारक्षक तैनात आहेत. तरीही या दोन्ही ठिकाणांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांतील घटनांनी आला. या दोन घटनांमुळे किमान यापुढे खबरदारी घेतली जाईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांक डून व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच शनिवारी खळबळ उडाली. छावणीतील लोखंडी पुलावर बस अडवून कर्णपुरा येथील मैदानावर नेण्यात आली. बॉम्बशोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकाने बसमधील प्रत्येक प्रवाशासह बसची कसून तपासणी केली, तेव्हा बॉम्बची अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

कर्णपुरा येथे बसच्या तपासणीत काहीही नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथे जाऊन अन्य शिवनेरी आणि अश्वमेध बसची तपासणी केली.  ही घटना होत नाही तोच दुसर्‍या दिवशी रविवारी घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या कार्यालयाशेजारी आढळलेल्या बेवारस वस्तूने  दुपारी खळबळ उडाली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने घाटीत जाऊन त्या वस्तूची तपासणी केली. या दोन्ही घटनांनी सुरक्षाव्यवस्थेचे पितळ उघडे पडले.

घाटीत १३४ ‘कॅमेरे’, १२४ सुरक्षारक्षकघाटी रुग्णालयाच्या परिसरात १३४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर १२४ सुरक्षारक्षक आहेत. या संख्येमुळे घाटी रुग्णालयावर करडी नजर असल्याचे दिसते; परंतु रविवारच्या घटनेने ‘कोणीही या आणि काहीही ठेवून जा’ अशीच परिस्थिती दिसत आहे. 

बसस्थानकात ९ सीसीटीव्ही, १३ सुरक्षारक्षकमध्यवर्ती बसस्थानकात ९ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर १३ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. यामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे समजते. सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांच्या अखत्यारीत  असून, एसटी महामंडळातर्फे लवकरच २७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शिवनेरी बसमध्येही सीसीटीव्ही कॅमेरा असतो.बसस्थानकात दररोज सातशेपेक्षा अधिक बसेस आणि २० ते २५ हजार प्रवाशांची ये-जा. घाटीतील ‘ओपीडी’त दररोज १५०० ते २००० रुग्णांची नोंद.

सतर्क राहण्याच्या सूचनारविवारची घटना ही सुरक्षारक्षकांमुळेच समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयात कार्यरत सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. काहीही संशयास्पद आढळल्यास तात्काळ सूचीत करण्याचे सांगितले आहे.- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

योग्य खबरदारीमध्यवर्ती बसस्थानकात १३ सुरक्षारक्षक असून, एका शिफ्टमध्ये चार सुरक्षारक्षक कार्यरत असतात. त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. शनिवारी घडलेल्या घटनेनंतर नवीन काही सूचना प्राप्त झालेली नाही.- स्वप्नील धनाड, आगार व्यवस्थापक (वरिष्ठ), मध्यवर्ती बसस्थानक

टॅग्स :state transportएसटीgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी