शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

मनपा क्षेत्रीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

By admin | Updated: July 20, 2014 00:28 IST

नांदेड : सिडको येथील क्षेत्रीय कार्यालयावर शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे यापुढे सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच नागरिकांशी नित्य संबंध येणाऱ्या मनपाच्या विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून

नांदेड : सिडको येथील क्षेत्रीय कार्यालयावर शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे यापुढे सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच नागरिकांशी नित्य संबंध येणाऱ्या मनपाच्या विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संभाव्य घटनेस प्रतिबंध करण्याची पूर्वतयारी करावी, अशी सूचना आयुक्त जी़ श्रीकांत यांनी सामान्य प्रशासन विभागाला केली़ सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर उपस्थित होऊ शकणाऱ्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित विभाग- प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी अप्पर आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, डॉ़ विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी पी़ पी़ बंकलवाड उपस्थित होते़ आयुक्त जी़ श्रीकांत म्हणाले, महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आणि अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत दु:खद असून हल्लेखोरांच्या वतीने काही लोकांनी खोटी तक्रार करून गुन्हा नोंदवण्यास भाग पाडल्याचे कळले़ त्यानंतर आपण पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली़ जमाव पांगवण्याच्या उद्देशाने कदाचित प्रतितक्रार स्वीकारून पोलिसांनी असे केले असावे़ कर्तव्य बजावताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खचून जाऊ नये़ प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले़ मूलभूत सुविधा पुरविताना महापालिकेस अनेकदा अप्रिय कारवाई करावी लागते़ अशाप्रसंगी सर्व क्षेत्रीय कार्यालय, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभाग, बीएसयुपी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध सेवा पुरविणाऱ्या विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ बसविण्यात यावेत, अशी सूचना उपायुक्त विद्या गायकवाड यांना केली़ कर्तव्य बजावताना कोणीही दबावतंत्राचा वापर करून अडथळा आणण्याची शक्यता असल्यास मला तत्काळ कळवावे़ त्यातून संबंधितांवर कसे नियंत्रण आणता येईल, याचा निर्णय घेता येईल़ आक्षेपकर्त्यांसोबत वादाचे प्रसंग टाळून सौम्य भाषेत संभाषण करून त्यांना माझ्याकडे किंवा अप्पर आयुक्तांकडे पाठवावे, असेही आयुक्त म्हणाले़ (प्रतिनिधी)