शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औषधी दुकानांमध्ये आता ‘सीसीटीव्ही’ बंधनकारक, विनाप्रिस्क्रिप्शन विक्रीवर बसणार लगाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 19:53 IST

लोकमत इम्पॅक्ट : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे निर्देश; ‘एक युद्ध - नशेच्या विरुद्ध’ अंतर्गत संयुक्त कृती योजना तयार

औरंगाबाद : औषधे व अमलीपदार्थांचा नशेसाठी गैरवापर रोखण्यासाठी संयुक्त कृती योजना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील सर्व औषधे विक्रेत्यांनी एक महिन्याच्या आत औषधे विक्रीच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग व अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरो यांच्या संयोगाने औषधांचा व अमलीपदार्थांचा नशेसाठी गैरवापर रोखण्यासाठी ‘एक युद्ध - नशेच्या विरुद्ध’ अंतर्गत संयुक्त कृती योजना तयार करण्यात आली होती. त्या संयुक्त कृती योजनेनुसार औषधांचा नशेसाठी गैरवापर रोखण्यासाठी तसेच परिशिष्ट एच, एच १ आणि एक्स या मधील औषधांची विक्री विनाप्रिस्क्रिप्शन होत असल्यामुळे औषध अवलंबित्व होत असल्याचे आढळून आले. सद्य:स्थितीत या बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे तशी यंत्रणा कार्यन्वित करण्याची आवश्यकता असल्याचे संयुक्त कृती योजनेत नमूद केलेले आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्देश दिले आहेत की, औषधांचा नशेसाठी गैरवापर रोखण्यासाठी व परिशिष्ट एच, एच १ आणि एक्स यामधील औषधांची विक्री विनाप्रिस्क्रिप्शन होऊन त्यापासून होणारे परिणाम रोखण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त कृती योजनेमधील मुद्दा क्रमांक ७-४ नुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १३३ नुसार औषधी दुकानांना सीसीटीव्ही बसविण्याबाबत व सर्व औषधांची विक्री संगणकीय बिलाद्वारे करण्यासंबंधी आवश्यक ती उपाययोजना आदेश पारीत होण्याच्या एक महिन्याच्या आत करण्यासंबंधीचे आदेश निर्गमित केलेले आहेत.

औषध प्रशासनाचे आवाहनजिल्ह्यातील सर्व औषधी दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व चौकशीसाठी आवश्यक तेव्हा फुटेज प्राधिकृत केलेल्या पोलीस व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करणे तसेच संगणकीय बिलांद्वारे औषधांची विक्री करणे बंधनकारक आहे. जेणेकरून औषधांचा नशेसाठी गैरवापर व विनाप्रिस्क्रिप्शन विक्रीवर वचक बसेल. या सर्व बाबी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या आदेशाचे पालन काटेकोरपणे करण्याबाबतचे आवाहन सर्व औषधी परवानाधारकांना व केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनला अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त श्याम साळे यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcctvसीसीटीव्हीMedicalवैद्यकीय