शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पतसंस्थेच्या कॅशिअरने केला वीज बिलाच्या दोन लाख रुपयाचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 18:29 IST

महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र असलेल्या एका पतसंस्थेच्या कॅशिअरने ग्राहकांकडून वीज बिलापोटी जमा केलेले तब्बल २ लाख १३ हजार २६७ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले.

औरंगाबाद : महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र असलेल्या एका पतसंस्थेच्या कॅशिअरने ग्राहकांकडून वीज बिलापोटी जमा केलेले तब्बल २ लाख १३ हजार २६७ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले. २४ जानेवारी रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेच्या संचालकांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. 

मुगेश लक्ष्मण जगताप असे अपहार करणार्‍या कॅशिअरचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सुलोचना दगडू आकसे (रा.न्यू एस.टी. कॉलनी) या  जयभवानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक आहेत. पुंडलिकनगर रोडवरील त्यांच्या पतसंस्थेला महावितरणचे अधिकृत वीज बिल केंद्र दिलेले आहे. या केंद्रात शहरातील वीज ग्राहक बीलाची रक्कम जमा करतात. त्यानंतर पतसंस्थेकडून त्यांना अधिकृत पावती मिळते. 

आरोपी मुगेश हा तक्रारदार यांच्या या वीज बिल भरणा केंद्रात कॅशिअर म्हणून नोकरीला आहे. २३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत त्याने  वीज ग्राहकांकडून २ लाख १३ हजार २६७ रूपये जमा केले. यानंतर त्याने ही रक्कम तातडीने पतसंस्थेच्या कार्यालयात जमा केली नाही. उलट तो तेथून गायब झाला. रोख रक्कमेसह कॅशिअर गायब झाल्याचे तक्रारदार यांना कळाल्याने त्यांनी आणि अन्य कर्मचार्‍यांनी त्याचा शोध घेतला. मात्र दुसर्‍या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत तो न भेटल्याने शेवटी आकसे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीची तक्रार  नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे या गुन्ह्याचा तपास करीत आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक एल.ए.सिनगारे यांनी सांगितले.