शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ‘ओला-सुका’वेगळे करणारे वॉर्ड मजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 18:45 IST

शहरातील जवळपास पन्नासपेक्षा अधिक वॉर्डांमध्ये मागील काही वर्षांपासून सुका व ओला कचरा वेगळा करूनच जमा करण्यात येतो. या प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा याच वॉर्डांना होत आहे.

ठळक मुद्दे‘माझी सिटी टकाटक’अंतर्गत मागील दीड-दोन वर्षांपासून नताशा जरीन आपल्या सहकार्‍यांसह कठोर परिश्रम घेत आहेत.त्यांनी जवळपास ७० वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्याची शिस्त मनपा कर्मचारी आणि नागरिकांना लावली.

औरंगाबाद : शहरातील जवळपास पन्नासपेक्षा अधिक वॉर्डांमध्ये मागील काही वर्षांपासून सुका व ओला कचरा वेगळा करूनच जमा करण्यात येतो. या प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा याच वॉर्डांना होत आहे. ओला कचरा संबंधित वॉर्डातच शास्त्रोक्त पद्धतीने जिरविण्यात येत आहे. सुका कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे जमा करण्यात येतो. त्यामुळे या वॉर्डांना कचरा कोंडीचा अजिबात त्रास नाही.

‘माझी सिटी टकाटक’अंतर्गत मागील दीड-दोन वर्षांपासून नताशा जरीन आपल्या सहकार्‍यांसह कठोर परिश्रम घेत आहेत. त्यांनी जवळपास ७० वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्याची शिस्त मनपा कर्मचारी आणि नागरिकांना लावली. याचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगण्यात आले. लोकसहभागातून उभी केलेली ही चळवळ चांगलीच हिट ठरली. त्यातील ५० वॉर्डांमध्ये आजही ओला व सुका कचरा वेगळाच जमा करण्यात येतोय. मनपा कर्मचारी हा ओला कचरा प्रभागात नेमून दिलेल्या जागेवर नेऊन शास्त्रोक्त पद्धतीने खत तयार करीत आहेत. सुका कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे कॅनपॅक कंपनीने उभारलेल्या शेडमध्ये आणून जमा होतो. येथे कचरा वेचक हे साहित्य उचलून नेतात. या सुका कचर्‍यावर शेकडो कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत, हे विशेष. 

महापालिकेचे शहरात नऊ झोन आहेत. त्यातील झोन क्रमांक ४, ५, ६, ७, ८ आणि ९ मध्ये बर्‍यापैकी कचर्‍यावर प्रक्रिया होते. झोन १ ते ३ पर्यंत अजिबात कचर्‍याचे वर्गीकरण होत नाही. जुन्या शहरातील हे तिन्ही वॉर्ड आहेत. यामध्ये व्यापारी बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या तीन झोनमुळे शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे डोंगर दिसून येत आहेत. ज्या वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून जमा करण्यात येतो तेथे तर कचरा कोंडी आहे किंवा असा प्रश्न औरंगाबादकरांना पडत आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद