शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूकदारांचा शुक्रवारपासून चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:07 IST

डिझेलचे भाव कमी करावते किंवा ६ महिने स्थिर किंमत ठेवावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील मालवाहतूकदार संघटना शुक्रवार, २० जुलैैपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डिझेलच्या किमती वाढल्याने कंपन्यांशी करारावर चालणाऱ्या मालट्रकच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. डिझेलचे भाव कमी करावते किंवा ६ महिने स्थिर किंमत ठेवावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील मालवाहतूकदार संघटना शुक्रवार, २० जुलैैपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करणार आहेत.आॅल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या वतीने चक्का जामची हाक दिली आहे. यास औरंगाबाद मालवाहतूकदार संघटनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले की, देशात ९० टक्के मालवाहतूक ट्रकद्वारेच होत असते. ट्रकचा ६५ टक्के खर्च डिझेलवर होत असतो. मागील ६ ते ७ महिन्यांत डिझेल लिटरमागे १६ रुपयांपर्यंत महागले आहे. मालट्रक व्यावसायिकांचा वर्षभरासाठी कंपन्यांशी करार झालेला असतो. मात्र, तेल कंपन्या दररोज १० ते ३० पैैसे भाववाढ करतात. कंपन्याही एकदम भाव वाढूवून देत नाहीत. सहा-सहा महिन्यांनंतर कंपन्या करारात डिझेलवाढीचा निर्णय घेतात. तोपर्यंत मालट्रक व्यावसायिकांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. केंद्र सरकारने डिझेलचे भाव कमी करावे. तसेच भाववाढ एकदम करावी, नंतर सहा महिने तेच भाव स्थिर ठेवावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. २० रोजीच्या संपात देशातील ९५ लाख मालट्रक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील २२ लाख पन्नास हजार आणि त्यामध्येच औैरंगाबादेतील साडेचार लाख ट्रकचा समावेश आहे.पहिले चार कंपन्यांचे कच्चामाल आणणे व उत्पादित वस्तू नेणे बंद करण्यात येईल. त्यानंतर सरकारने दुर्लक्ष केले तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही बंद केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्र सरकारने लेखी व तोंडी आश्वासन न देता आता निर्णय घ्यावा व त्याची अंमलबजावणी सुरू केल्यानंतरच मालट्रकचे चक्का जाम आंदोलन मागे घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. यावेळी असद अहमद, जयकुमार थानवी, एम.जी. इरफानी, राजेंद्र माहेश्वरी आदीं मालवाहतूकदारांची उपस्थिती होती.

टॅग्स :Strikeसंपagitationआंदोलन