शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

निष्काळजीपणा ! हॉटस्पॉटमधील महिलेवर जनरल वार्डात केले उपचार ; अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ११ कर्मचारी अलगीकरण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 12:18 IST

जनरल वार्डात हॉटस्पॉटमधील वृद्ध महिलेवर उपचारानंतर अहवाल आला पाॅझीटीव्ह

ठळक मुद्देमहिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलाआतापर्यंत ११० आरोग्य कर्मचारी अलगिकरण विभागात

औरंगाबाद :  किलेअर्कच्या हॉटस्पॉटमधील वृद्ध महिलेला कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. म्हणून संशयीत वॉर्डाएवजी जनरल वॉर्डात भरती करण्यात आला. त्या महिलाच कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे काळजी म्हणून सोमवारी रात्री घाटीतील ११ जणांना कॉरंटाईन करण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. यापुर्वी घाटीतील ९९ जणांना कॉरंटाईन करण्यात आल्याने अलगीकरणाचा आकडा ११० वर पोहचला आहे. त्यामुळे घाटीतील वैद्यकीय कर्मचार्यांच्या सुरक्षेबाबतचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

शहरात अवघ्या १२ तासात तब्बल ४२ रुग्ण आढळून आकडा ९५ वर पोहचला असताना वैद्यकीय कर्मचारी अलगिकरणात जाणे किंवा त्यांना संसर्ग होणे परवडणारे नाही याबाबद्दल चिंता व्यक्त होत आहे.वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले, घाटी रुग्णालयात किलेअर्क परिसरातील ६५ वर्षीय महिला शनिवारी (दि.२५) भरती झाली. कोव्हीड वॉर्डात भरती करण्याएवजी या महिलेला लक्षणे नसल्याने सर्जीकल इमारतीत जनरल मेडीसीनच्या वॉर्ड १५-१६ मध्ये ठेवण्यात आले. दोन दिवसानंतर सोमवारी या महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने या महिलेच्या संपर्कातील ७ परिचारीका, ३ निवासी डॉक्टरसह एका इनटर्न डॉक्टर अशा अकरा जणांना मुत्रपिंड विभागाच्या अलगीकरण कक्षात भरती करण्यात आले.

 या महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यावर त्यांना न्युमोनिआ आणि मधुमेहचाही त्रास असल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. तर रुग्णालय प्रशासनाचे डॉ. सुरेश हरबडे व डॉ. विकास राठोड यांच्या उपस्थितीत या कर्मचार्यांना सोमवारी रात्री मुत्रपिंडविकार विभागाच्या अलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. यापुर्वी अलगीकरणात गेलेल्या ९९ पैकी बहुतांश लोक ड्युटीवर परतले आहेत.

सुरक्षा साधानाची कमतरता

कोव्हीड क्रीटीकल हॉस्पीटल म्हणून घाटीतील मेडीसीन बिल्डींग राखीव करण्यात आली. सध्या इथे एमआयसीयू, आयसीयू हे अत्यवस्थ व पॉझीटीव्ह रुग्णांसाठी, वॉर्ड सहा सारी वॉर्ड, आणि वॉर्ड चार संशयीत रुग्णांसाटी सुरु आहे. संशयीत वॉर्डांत आतापर्यंत पाच पेशंट मृत झाले. तर एक पॉझीटीव्ह आला. तरी या वॉर्डाचे अद्याप निर्जंतुकीकरण झालेले नाही. येथील कर्मचार्यांना सुरक्षेची साधणेही अपुरी आहेत. त्यामुळे बारा बारा तास एकच मास्क वापरावा लागत असल्याची परिस्थिती आहे.

वरिष्ठ डॉक्टरांचे दुर्लक्ष

रुग्ण भरती होतांना तो कोव्हीड वॉर्डात भरती करायचा कि नाही याकडे पथक प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. त्याकडे प्रशासनहूी लक्ष देत नाही. ज्यांना गरज नाही. त्यांना संशयीत वॉर्डात तर गरज असलेल्यांना जनरल वॉर्डात भरती केल्याचे तिन प्रकार शनिवार आणि रविवारच्या रुग्ण भरतीतून समोर आले आहे. यातून मृतदेह ठेवण्यापासून अहवाल आल्यावर मृतदेह नातेवाईकांना सुपर्द करण्यापर्यंत अनेक अडचणींचा नातेवाईकांना सामना करावा लागला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद