शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

औरंगाबादेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडून पळालेल्या कार, टेम्पोसह चालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:23 IST

महाविद्यालयात जाताना मोपेडस्वार वैभवी सुनील खिरड (१७) या विद्यार्थिनीला चिरडून पसार झालेल्या कार आणि टेम्पोचालकाला अटक करण्यात उस्मानपुरा पोलिसांना रविवारी रात्री अखेर यश आले.

ठळक मुद्देदोन्ही वाहने जप्त: सहा दिवसापूर्वी झाला होता अपघात

औरंगाबाद : महाविद्यालयात जाताना मोपेडस्वार वैभवी सुनील खिरड (१७) या विद्यार्थिनीला चिरडून पसार झालेल्या कार आणि टेम्पोचालकाला अटक करण्यात उस्मानपुरा पोलिसांना रविवारी रात्री अखेर यश आले. कारचालकास सिंधीबन झोपडपट्टीतून तर टेम्पोचालकास दौलताबादेतून पोलिसांनी अटक केली. दोन्ही वाहनेही पोलिसांनी जप्त केली.कारचालक सुभाष भानुदास बोडखे (३३, रा. कुंभारगल्ली, दौलताबाद) आणि टेम्पोचालक भाऊसाहेब तुकाराम साळवे (४४, रा. सिंधीबन झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत कदम म्हणाले की, चाणक्यपुरीतील रहिवासी वैभवी २४ आॅक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास मोपेडवरून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात जाताना पीरबाजार रस्त्यावरील भाजीवालीबाई चौकात अज्ञात वाहनाने चिरडल्याने ठार झाली होती. तिला उडविणारी वाहने अपघातानंतर पसार झाली होती. पोलीस त्या वाहनांचा शोध घेत होते. तेथील खाटकाच्या दुकानावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत अपघात कैद झाला होता. तिला पांढºया रंगाच्या कारने उडविले आणि विटाची वाहतूक करणाºया टेम्पोने चिरडल्याचे स्पष्ट झाले होते. कॅमेºयाच्या फुटेजमुळे दोन्ही वाहनांचे अर्धवट क्रमांक पोलिसांना मिळाले. पोलिसांनी खबºयाला कामाला लावले. वैभवीच्या नातेवाईकांशी बोलून अपघातामधील वाहनांबाबत काही माहिती मिळते का, हे पाहण्यास सांगितले. औरंगाबादेत टेम्पोने दौलताबादेतून विटा येतात. त्यावरून दौलताबाद येथील खबºयाला कामाला लावले. बोडखे चालवीत असलेल्या टेम्पोने हा अपघात केल्याचे खबºयाकडून समोर आले. घटनेपासून बोडखेने त्याचा टेम्पो (एमएच-२० सीटी ७६०६) एका ठिकाणी उभा करून ठेवल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण, कल्याण शेळके आणि कर्मचाºयांनी रविवारी रात्री दौलताबाद गाठून बोडखेला अटक केली. त्याच्या ताब्यातून टेम्पोही जप्त करून शहरात आणला. तपासादरम्यान वैभवीला उडविणारी कार भास्कर मुरमे (रा. सिंहगड कॉलनी, सिडको एन-६) यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा कारचालक साळवे अपघात झाल्यानंतर दोन दिवसांपासून कामावर आला नसल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी कारमालक मुरमे यांच्याशी संपर्क साधून कार जप्त केली. या अपघाताविषयी मुरमे यांना काहीच माहिती नव्हती. त्यामुळे ते बिनधास्तपणे कार वापरत होते. सिंधीबन येथे सापळा रचून पोलिसांनी चालक साळवेला अटक केली.विजयनगर चौकाकडे जात होता टेम्पोसुभाष बोडखे त्या दिवशी सकाळी विटा भरलेला टेम्पो विजयनगर चौकाकडे घेऊन जात होता. रेल्वेस्टेशनमार्गे शहानूरमियां दर्ग्याकडे जाताना भाजीवालीबाई चौकातच अपघात झाला. टेम्पोच्या मागील चाकाखाली येऊन वैभवी ठार झाली. अपघात घडला त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने आपण पळून गेल्याचे टेम्पोचालक बोडखेने पोलिसांना सांगितले.मुलीला शिकवणीला सोडून निघाला होता कारचालककारमालक मुरमे यांच्या मित्राच्या मुलीला उस्मानपुºयातील कोचिंग क्लासमध्ये सोडून कारचालक साळवे परत रेल्वेस्टेशनकडे जात होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि चाणक्यपुरीकडून रेल्वेस्टेशनकडे जाणाºया मोपेडस्वार वैभवीला त्याने उडविले. पकडल्या जाण्याच्या भीतीपोटी तेथे न थांबता तो पसार झाला.प्रत्यक्षदर्शींनी घेतली बघ्याची भूमिकाअपघातानंतर दोन्ही वाहने दोन ते चार मिनिटे घटनास्थळी थांबली होती. लोकही जमले. मात्र त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने त्या वाहनांना पळून जाता आले.दोन्ही चालकांना जामीनवैभवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी रात्री कारचालक साळवे आणि टेम्पोचालक बोडखेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सोमवारी दुपारी दोन्ही आरोपींना उस्मानपुरा पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. अपघातप्रसंगी वाहनामध्ये आणखी कोण होते, याबाबतचा तपास केला जात आहे, अशी माहिती पो.नि.कदम यांनी दिली. ही कारवाई उपनिरीक्षक चव्हाण, शेळके, कर्मचारी प्रल्हाद ठोंबरे, मनोज बनसोडे, संतोष शिरसाट, संजयसिंग ढोबाळ यांनी केली.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा