शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

सासऱ्यांच्या अस्थी विसर्जनासाठी कायगावकडे जाताना कारला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 12:31 IST

Burning Car औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर चालत्या वाहनाला आग लागून भस्मसात होण्याची ही दुसरी घटना आहे.

ठळक मुद्देकारमधील चौघेजण सुखरुप असून जीवितहानी टळली

औरंगाबाद : सासऱ्यांच्या अस्थी विसर्जनासाठी कायगावकडे जाणाऱ्या कारला अचानक आग लागून ती भस्मसात झाल्याची घटना शनिवारी सकाळी नगर रोडवर गोलवाडी रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली. यावेळी प्रसंगावधान राखून वेळीच कार रस्त्याकडेला थांबवून त्यातील जावई, मुलगी आणि अन्य दोन असे चारजण सुखरुप बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

उस्मानपुरा परिसरातील द्वारकापुरी येथील समाधान गवई यांचे सासरे मारुतीराव परशुराम मोरे यांचे दोन दिवसांपूर्वी अल्प आजाराने निधन झाले. त्यामुळे शनिवारी सकाळी ९.३०च्या सुमारास जावई समाधान गवई, मुलगी डॉ. दीपाली मोरे व अन्य दोन नातेवाईक कार क्रमांक (एमएच २०- डीवाय- ३३०७)मधून मारुतीराव मोरे यांची अस्थी घेऊन कायगाव येथे विसर्जन करण्यासाठी निघाले होते. दरम्यान, गोलवाडीजवळील उड्डाणपुलाजवळ ही कार येताच अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच तत्काळ रस्त्याकडेला कार उभी करुन त्यातून दोन पुरुष व दोन महिला तत्काळ बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत कार भस्मसात झाली. या घटनेत कारचे ५ लाखांचे नुकसान झाले.

ही घटना पाहण्यासाठी जाणारी-येणारी वाहने थांबल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळताच छावणी ठाण्याचे दिलीप गांगुर्डे, वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंखे यांनी वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अग्निमशन दलाला पाचारण केल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक प्रमुख एल. पी. कोल्हे, विनायक लिमकर, संग्राम मोरे, अक्षय नागरे, परमेश्वर साळुंके, सुभाष दुधे, आदींनी घटनास्थळी येत अथक परिश्रमानंतर कारला लागलेली आग नियंत्रणात आणली.

महिनाभरातील दुसरी घटनाऔरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर चालत्या वाहनाला आग लागून भस्मसात होण्याची ही दुसरी घटना आहे. ८ एप्रिल रोजी भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८ रुग्णवाहिका (एमएच १४ - सीएल - ०७९३) ही औरंगाबादच्या दिशेने निघाली होती. वाळूजजवळ सायंकाळी ४.३०च्या सुमारास चालक सचिन कराळे यांना रुग्णवाहिकेतून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्याकडेला रुग्णवाहिका उभी केली व डॉक्टर, चालक यांनी रुग्णवाहिकेतून खाली उड्या मारल्या. या घटनेत रुग्णवाहिका जळून खाक झाली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआग