शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:47 IST

शेंद्रा एमआयडीसीत ‘केनिया डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला जागा, कंपनी शिरसाट यांच्या मुलाची असल्याचा दावा

छत्रपती संभाजीनगर: सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याभोवती वादांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. हॉटेल वेदांत लिलाव वादाच्या सावलीतून ते अजून सावरत नाहीत, तोवर आता माजी खासदार व एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

शेंद्रा एमआयडीसी परिसरात ‘केनिया डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीला तब्बल २१ हजार चौरस फूट जागा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी पालकमंत्र्यांचे सुपुत्र यांच्या मालकीची असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. या भूखंडासाठी पूर्वी ट्रक टर्मिनलचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, ते आरक्षण हटवून ही जागा मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीला दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

“फूड प्रॉडक्ट निर्मितीच्या नावाखाली असलेल्या कंपनीला प्रत्यक्षात अल्कोहोल युनिट सुरू करण्यासाठी जागा देण्यात आल्याचा हा प्रकार गंभीर असून, यामागे शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा संशय नाकारता येणार नाही,” अशी घणाघाती टीका जलील यांनी केली. “शासनाने या प्रकरणात पारदर्शकता दाखवून दोषींवर करावी” अशी मागणी जलील यांनी पत्रकार परिषदेतून केली. दरम्यान, ‘हॉटेल वेदांत’च्या लिलावातील कथित गैरव्यवहार प्रकरणातही शिरसाट अडचणीत सापडलेले असतानाच, हा नवा वाद त्यांच्या अडचणीत भर घालणारा ठरू शकतो.

काय होता हॉटेल वेदांत व्यवहार वाद?विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्यावर आरोप करताना, हॉटेल वेदांतची रेडीरेकनरप्रमाणे किंमत सुमारे ११० कोटी रुपये, मात्र बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी किमतीत म्हणजे ६७ कोटींना मिळाल्याचा दावा केला. यावर मंत्री शिरसाट यांनी "लिलावात उतरण्याआधी काही रक्कम भरावी लागते, मग २५ टक्के रक्कम भरावी लागते. त्यानतंर कोर्टात उर्वरित ७५ टक्के रक्कम भरावी लागते. आता ६७ कोटी ही किंमत कोर्टाने ठरवलेली आहे. पण पुढे प्रक्रिया काहीही झालेली नाही. जो व्यवहार पूर्ण झालेला नाही, त्यावरून टीका सुरू झाली. माझ्यावर जे आरोप झालेत त्यामुळे मी माझ्या मुलाला या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्यास सांगणार आहे", असंही संजय शिरसाट यांनी जाहीर केले आहे.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटImtiaz Jalilइम्तियाज जलीलShendra MIDCशेंद्रा एमआयडीसी