शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण

By साहेबराव हिवराळे | Updated: June 23, 2024 18:12 IST

दिवसभर टाळ वाजवून उपोषणकर्ते यांनी केले भजन

छत्रपती संभाजीनगर : ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ...मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, ‘साताऱ्याचा खंडोबा.... शासनाला बुद्दी द्या...’,‘मनपाच्या आयुक्ता.. गुंठेवारी रद्द करा....’ अशा एक ना अनेक घोषणा देत गुंठेवारी कायद्याच्या विरोधात रविवारी (दि.२३) सातारादेवळाई परिसरातील नागरिकांनी नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली उपोषण करत भजनं गायले.

सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांनी आंदोलन दरम्यान सांगितले की, आम्ही स्वतः हक्काची जमीन खरेदी करीत सर्व नियमांचे पालन केले, त्यानंतरच घरे बांधली. आता गुंठेवारी सारखा रजाकरी कायदाआमच्यावर लागू केला हा कायदा रद्द करा यासाठी आम्ही दिवसभर टाळ वाजवून, भजन गात, घोषणा देत, उपोषणही केले. या कठोर गुंठेवारी कायद्याला रद्द करून आम्हाला निवांत जगू द्या अशी आमची ही मागणी शासनापर्यंत, मनपापर्यंत पोहचावी यासाठी हे अनोखे आंदोलन केले आहे.

दिवसभर आंदोलनस्थळी यांनी दिल्या भेटी....यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले,सुदाम सोनवणे,विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे,बाळू गायकवाड,रमेश गायकवाड, हरिभाऊ हिवाळे,राजू शिंदे,खाजाभाई यांच्यासह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी येऊन गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय प्रयत्न करता येईल आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. पालकमंत्री यांनी दोन जुलैला मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी बैठक लावण्याचे मार्गदर्शनात सांगितले.

दिवसभर टाळ,घोषणाबाजी नंतर इशारानागरिकांनी यावेळी ‘आश्वासन नको तर प्रत्यक्ष कृती हवी’, अशी अपेक्षा व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत रोष व्यक्त केला जाईल असा इशाराही देण्यात आला. याशिवाय मनपाच्या अधिकारीवर्गानेही याकडे लक्ष द्यावे आवाहन करण्यात आले.

यांनी घेतला सहभागरविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५वाजेपर्यंत सातारा देवळाई भागातील नागरिक लाक्षणिक उपोषण बीड बायपास रोड जबिंदा मैदान जवळ पुलाखाली बसलेले होते. लवकर निर्णय घ्या अन्यथा आंदोलन मिश्र करण्याचा इशारा सातारा देवळाई भागातील संयोजन समितीचे रवींद्र पिंगळीकर, सविता कुलकर्णी, प्रा.स्मिता अवचार,प्रा एकनाथ साळुंके , लक्ष्मन शिंदे,असद पटेल, ॲड सुधीर कुलकर्णी,राजेंद्र कुमावत, राजेंद्र फिरोदिया,प्रा भारती भांडेकर, कल्पना राजपूत,मारोती वीर,आर.डि भुकेले, आबासाहेब देशमुख, महेश चिद्रवार, पद्मसिंह राजपुत, शरद देशपांडे, अनंत सोन्नेकर, नामदेव पवार,दिलीप भोपे, अश्विनी बेंद्रे,अनिरुद्ध जागीरदार , सुनिल गुट्टे, मीनल ईप्पर,बाजीराव गाडे, अँड . क्षितिज रोडे, अंबादास रगडे, अशोक तिनगोटे, ज्ञानेश्वर बोरसे  यांनी दिला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद