शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: May 11, 2024 20:07 IST

आज चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला आहे. 13 तारखेला मतदान होणार आहे. यासाठी, आता सध्या पडत असलेल्या रणरणत्या उन्हात, औरंगाबादच्या मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रांपर्यंत आणणे सर्वच पक्षांसमोरील मोठे आव्हान अहे.

श्रीकृष्ण अंकुश -यावेळच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध एआयएमआयएम, अशी चुरशीची लढत होत आहे. महत्वाचे म्हणजे, येथे पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना, सामना रंगला आहे. AIMIMचे नेते खासदार इम्तियाज जलील, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे हे तीनही नेते तुल्यबळ असल्याचे मानले जात आहे. कोण जिंकेल? हे सांगणे कठीण आहे. एवढी अटीतटीची लढाई असतानाही, प्रचारात मात्र कुठल्याही पक्षाचा जोर बघायला मिळाला नाही. यातच, आज चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला. यामुळे आता 13 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढण्यात कोण यशस्वी ठरणार आणि कुणाला फायदा होणार? हे बघण्यासारखे असेल.

रणरणत्या उन्हात लोकांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान -खरे तर, यावेळी कुठल्याही पक्षाच्या प्रचारात स्थानिक पातळीवर नेहमी प्रमाणे जोर दिसला नाही. नेहमी प्रमाणे गावा गावात प्रचारसभा दिसून आल्या नाही. गावा-गावांतून नेत्याच्या प्रचारासाठी भोंगे लावून फिरणारी वाहणे, संबंधित उमेदवार अथवा संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावातून रॅली काढत लोकांना मतदानाचे आवाहन केल्याचे, मतदारांना भेटल्याचे क्वचितच बघायला मिळाले. आज चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला आहे. 13 तारखेला मतदान होणार आहे. यासाठी, आता सध्या पडत असलेल्या रणरणत्या उन्हात, औरंगाबादच्या मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रांपर्यंत आणणे सर्वच पक्षांसमोरील मोठे आव्हान अहे.

यावर अवलंबून असणार 4 तारखेचा निकाल - सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. याचा परिणाम राज्यात आतापर्यंत झालेल्या मतदनावरही झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद मतदारसंघातील लोकांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यात कोण यशस्वी होणार? बुथ पातळीवरील कार्यकर्ते किती जोर लावणार? आणि त्यांनी जोर लावल्यानंतरही मताचे विभाजन लक्षात घेता, त्याचा फायदा कुणाला किती होणार? या दृष्टीने लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. कारण यावरच 4 तारखेचा निकाल अवलंबून असणार आहे.

गेल्यावेळी अशी होती औरंगाबाद मदारसंघाची स्थिती -गेल्या निवडणुकीत AIMIM चे इम्तियाज जलील यांनी, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा, भाजपसारखा मोठा पक्ष सोबत असतानाही पराभव केला होता. खैरे साधारणपणे साडेचार हजार मतांनी पराभूत झाले होते. आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. चंद्रकांत खैरे ठाकरे गटाकडून मैदानात आहेत. त्यांच्या पाठीशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. तर संदिपान भुमरे शिंदे गटाकडून मैदानात असून त्यांच्यासोबत भाजपची ताकद आहे. तसेच जलील यांच्यासोबत आता वंचित नाही, मात्र एकगठ्ठा मुस्लीम मतदान आहे. अशा प्रकारे औरंगाबाद लोकसभेची निवडणूक अटीतटीची असल्याने या तिनही पक्षांना मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उरलेल्या दोन दिवसांत मोठी ताकद लावावी लागणार आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलीलChandrakant Khaireचंद्रकांत खैरेSandipan Bhumreसंदीपान भुमरे