शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

केम्ब्रिजवर मात करीत स.भु. अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:54 IST

गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर सरस्वती भुवन प्रशालेने लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केम्ब्रिज संघावर ९ गडी राखून दणदणीत विजयासह दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. सरस्वती भुवन प्रशालेची गाठ आता उद्या, गुरुवारी नाथ व्हॅली संघाविरुद्ध पडणार आहे.

ठळक मुद्देआंतरशालेय क्रिकेट स्पर्धा : आज नाथ व्हॅलीसोबत विजेतेपदासाठी झुंज

औरंगाबाद : गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर सरस्वती भुवन प्रशालेने लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केम्ब्रिज संघावर ९ गडी राखून दणदणीत विजयासह दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. सरस्वती भुवन प्रशालेची गाठ आता उद्या, गुरुवारी नाथ व्हॅली संघाविरुद्ध पडणार आहे.गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर सरस्वती भुवनने बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या केम्ब्रिजला १0 षटकांत ६ बाद ५१ धावसंख्येत रोखले. त्यांच्याकडून संकेत पाटील (२४) याच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडी धावा पार करू शकला नाही. सरस्वती भुवन प्रशालेकडून आदित्य राजहंस याने १५ धावांत २ गडी बाद केले. त्याला चैतन्य वाघमारे, प्रसाद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. त्यानंतर सरस्वती भुवनने विजयी लक्ष्य ७ षटकांत फक्त १ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून कृष्णा पवार याने १९ चेंडूंतच ४ खणखणीत चौकारांसह २५ धावा फटकावल्या. आदित्य राजहंसने १0 चेंडूंत एका चौकारांसह नाबाद १२ धावा केल्या. या सामन्यात कृष्णा पवार सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. उद्या, गुरुवारी सकाळी ८.३0 वाजता सरस्वती भुवन आणि नाथ व्हॅली यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. अंतिम सामन्यानंतर ११.३0 वाजता बक्षीस वितरण रंगणार आहे.बक्षीस वितरण सोहळ्यात विजय झोल राहणार आकर्षणउद्या, गुरुवारी सकाळी ११.३0 वाजता होणाºया लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणास रणजीपटू आणि अंडर १९ वर्ल्डकप संघाचा माजी कर्णधार विजय झोल हा आकर्षण ठरणार आहे. यावेळी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.२0११ मध्ये कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत नाबाद ४५१ धावांची विक्रमी खेळी करणाºया विजय झोल याने २0१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच २0१४ वर्ल्डकपमध्ये तो अंडर १९ भारतीय संघाचा कर्णधार होता. विजय झोलने न्यूझीलंडविरुद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शतक ठोकत पदार्पण केले. तसेच रणजी करंडकाच्या पदार्पणातही द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. २0१४ मध्ये महाराष्ट्राला अंतिम फेरीत पोहोचविण्यातही त्याने निर्णायक योगदान दिले होते.संक्षिप्त धावफलककेम्ब्रिज : १0 षटकांत ६ बाद ५१. (संकेत पाटील नाबाद २४, आदित्य राजहंस २/१५).सरस्वती भुवन प्रशाला : ७ षटकांत १ बाद ५२. (कृष्णा पवार नाबाद २५, आदित्य राजहंस नाबाद १२. रौनक डोडिया १/१२).