औैरंगाबाद : महापालिकेत मागील काही दिवसांपासून संचिका गहाळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या कामाची संचिका अंतिम मंजुरीसाठी असतानाच ती गहाळ होते. ज्योतीनगर वॉर्डाच्या नगरसेविका सुमित्रा हळनोर यांच्या वॉर्डातील विकासकामांच्या दोन संचिका गायब झाल्या आहेत. लेखा विभागातून या संचिका नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांचे दीर पंकज वाडकर यांनी घेतल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. संचिकांच्या पळवापळवीने सेनेच्या दोन नगरसेविकांमधील भांडण विकोपाला गेले आहे.ज्योतीनगर वॉर्डातील रस्ते कामांच्या दोन संचिका १४ जानेवारीला मुख्य लेखाधिकाºयांच्या स्वाक्षरीनंतर गहाळ झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. महापालिकेतील शिवसेना पदाधिकाºयांनी शनिवारी सकाळी ११ वाजता लेखा विभागाशी संबंधित नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेतली. कर्मचारी जागेवर नव्हता, त्यावेळी संचिका गेल्याचे अधिकाºयांनी नमूद केले. त्यानंतर पदाधिकाºयांनी सीसीटीव्हीचे फुटेजही मागविले. या फुटेजमध्ये नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांचे दीर पंकज वाडकर यांनी १४ जानेवारीला दुपारी ३.२० वाजता लेखा विभागातून काही संचिका पिशवीत टाकून नेल्याचे समोर आले. त्यानंतर मात्र पदाधिकाºयांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी कोणत्या संचिका गहाळ झाल्या? कोणत्या वॉर्डाच्या होत्या? असे प्रश्न विचारत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणला.पंकज वाडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले की, सीसीटीव्हीत मी दिसतोय हे खरे आहे; पण मी माझ्या वॉर्डातील संचिका घेतल्या. मनपा कर्मचाºयाला सांगून या संचिका घेतल्या आहेत. दुसºयांच्या संचिकांना हात लावण्याचा प्रश्नच येत नाही.आयुक्तांना माहिती नाहीसंचिका गहाळ प्रकरणाबाबत मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी आपल्याला विषय माहीत नाही. मात्र, अधिकाºयांमार्फत माहिती मागविली आहे. संचिका गहाळ झाली असेल तर यापुढे योग्य ती दखल घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.नगरसेविका पतीला दिल्या संचिकामहापालिकेच्या लेखा विभागातील सीसीटीव्हीत एमआयएम पक्षाच्या एका नगरसेविकेच्या पतीला मनपा कर्मचाºयाने काही संचिका दिल्याचेही दिसून येत आहे. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी नगरसेविका पती आणि नातेवाईकांना संचिका देण्यास मनाई केली होती.
सेना नगरसेविकांमध्ये संचिकांची पळवापळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:02 IST
महापालिकेत मागील काही दिवसांपासून संचिका गहाळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या कामाची संचिका अंतिम मंजुरीसाठी असतानाच ती गहाळ होते. ज्योतीनगर वॉर्डाच्या नगरसेविका सुमित्रा हळनोर यांच्या वॉर्डातील विकासकामांच्या दोन संचिका गायब झाल्या आहेत. लेखा विभागातून या संचिका नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांचे दीर पंकज वाडकर यांनी घेतल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. संचिकांच्या पळवापळवीने सेनेच्या दोन नगरसेविकांमधील भांडण विकोपाला गेले आहे.
सेना नगरसेविकांमध्ये संचिकांची पळवापळवी
ठळक मुद्देसीसीटीव्हीचा घेतला आधार : पदाधिकाऱ्यांकडून प्रकरणावर पडदा