शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळाचे खातेवाटप १५ ऑगस्टपूर्वी, जे खाते मिळेल त्यात बेस्ट करू: अतुल सावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 17:47 IST

मुख्यमंत्री शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील त्यात 'बेस्ट' काम करू

औरंगाबाद: शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस झाल्यानंतरही अद्याप खातेवाटप झाले नाही. दरम्यान, खातेवाटप १५ ऑगस्टपूर्वी करण्यात येईल अशी माहिती भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सावे यांचे औरंगाबाद येथे आज आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्य सरकारचा तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्या प्रत्येकी ९ अशा १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यालाही आता तीन दिवस झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर १८ मंत्र्यांना १८ जिल्ह्याचे पालक केले आहे. खातेवाटप जाहीर नसल्याने अनेक कामांचा खोळंबा झाला असून पालकमंत्र्यांची नियुक्ती देखील रखडली आहे.

जसा मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला तसा खातेवाटपाला देखील वेळ लागत आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका सुरु केली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर आता भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सावे यांचे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज शहरात आगमन झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी खाते वाटपावर भाष्य केले आहे. १५ ऑगस्ट पूर्वी मंत्रिमंडळाचे खाते वाटप होईल. मुख्यमंत्री शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील त्यात 'बेस्ट' काम करू, अशी ग्वाही देत सावे यांनी चांगले खाते मिळेल असेही अप्रत्यक्ष संकेत दिले. तसेच शहराच्या विकासात मंत्रिपदाने योगदान देऊ, महापालिकेवर शिंदे गटाला सोबत घेऊन भगवा फडकवू असेही सावे म्हणाले.   

टॅग्स :Atul Saveअतुल सावेAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस