मानवत : तालुक्यातील गोगलगाव येथे गावाच्या बाजूस असलेल्या परसातील कडब्याच्या गंजींना शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची २९ मे रोजी सकाळी ८़४५ वाजता घडली़ गोगलगावच्या गावाशेजारी परसामध्ये अनेक शेतकर्यांचे गोठे आणि कडब्याच्या गंजी लावलेल्या आहेत़ गुरुवारी सकाळी ८़४५ वाजता डिपीवरील शॉर्टसर्किटमुळे गावाशेजारील कडब्याच्या गंजींना आग लागली़ या आगीत भीमा किशन कांबळे, सोनाजी भाऊराव कोरडे, परमेश्वर भानुदास कोरडे यांच्या कडब्याच्या गंजी जळून खाक झाल्या़ या आगीत साधारणपणे ११ ते १२ हजार कडब्याच्या पेंंढ्या जळून खाक झाल्या़ यामुळे शेतकर्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले़ शिवाय जनावरांचा चारा गेल्याने या शेतकर्यांपुढे संकट उभे टाकले आहे़ तसेच रमाबाई लुचारे यांच्या घरावरील पत्रे आणि साहित्य जळून खाक झाले़ आगीची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व्ही़ एच़ मंतावाड यांनी घटनास्थळास भेट दिली़ आग लागलेली कळताच घटनास्थळी पोलिस पाटील जिजाभाऊ मगर, सरपंच बाबासाहेब गुरव, उपसरपंच आबासाहेब पोंडाळ, नानासाहेब मगर, भगवान मगर, अण्णा मगर व गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले़ परंतु, सुटलेल्या वार्यामुळे आगीची तीव्रता वाढल्याने संपूर्ण कडबा जळून खाक झाला़ (वार्ताहर) ऩप़चे अग्निशमन वाहन कमजोरच गोगलगाव येथील कडब्याच्या गंजींना आग लागल्याचे मानवत येथील अग्निशमन वाहनाला सकाळी ९ वाजता कळविण्यात आले़ अर्ध्या तासाच्या आत अग्निशमन दलाचे वाहन वाहन चालक मधुकर खटले आणि सह कर्मचारी मुकेश कुमावत, राम दहे हे ९़३५ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले़ कर्मचार्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले़ परंतु, अग्निशमन दलाचे वाहनामध्ये उणिवा असल्याने कमकुवत होते़ त्यामुळे ज्या वेगाने आग विझायला पाहिजे होती, त्या वेगात आग विझली नाही़ जितके नुकसान व्हायचे तितके झालेच़ संभाव्य नुकसान मात्र यामुळे टळले़ मानवतच्या अग्निशमन दलाच्या वाहनात हाऊस पाईप, बोअरकटर, हार्डसेक्शन पाईप, गमशुज आदी अत्यावश्यक साहित्य नाही़ यामुळे आग विझविण्याचे काम करताना कर्मचार्यांचे बुटेही जळाले़ तर गाडीला सध्या एक इंची पाईपवर काम करावे लागत असल्याने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविता येत नाही़ कर्मचार्यांचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या वाहनात अडीच इंची पाईप असल्यास पाण्याचा वेग वाढवून आग तत्काळ आटोक्यात येते़ परंतु, महिन्यापासून नगरपालिकेने गाडीतील ज्या उणिवा आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला नाही़ अनेक ठिकाणी आग विझविण्यासाठी गेल्यानंतर या अग्निशमन दलाच्या वाहने एक ते दीड लाख रुपयांची कमाई केली़ परंतु, या कमाईतून गाडी अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्न मात्र झाले नाहीत़ १५ मिनिटांचे आग विझविण्याचे काम एक तासाचे वेळ घेते आणि यातून समाधानही होत नाही़ ही बाब सर्वसामान्यांना माहीत नसल्यामुळे अग्निशमन वाहन आले आणि त्याने आग विझविली यातच लोकांचे समाधान असते़ अग्निशमन दलाच्या वाहनांवरील कर्मचार्यांना पगारी नसल्याने त्यांचीही काम करण्याची मानसिक स्थिती चांगली नाही़ या सगळ्या गोष्टींचा विचार करून नगरपालिकेने अग्निशमन वाहन अद्ययावत करण्याची गरज आहे़ गोगलगाव येथील आगीच्या घटनेत या वाहनांवरील कर्मचारी मधुकर खटले, मुकेश कुमावत, राम दहे यांचे तेथील नागरिकांनी स्वागत केले़
कडब्याची गंजी जळून खाक
By admin | Updated: May 30, 2014 00:21 IST