शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

वाहन खरेदी सुसाट! छत्रपती संभाजीनगरात दररोज नवीन १६८ पेट्रोल, तर १६ ई-वाहने रस्त्यावर

By संतोष हिरेमठ | Updated: May 10, 2023 16:15 IST

वर्षभरातील नव्या वाहनांनी यंदा गाठला कोरोनापूर्वीचा आकडा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दररोज तब्बल नवीन १६८ (फोर व्हीलर आणि टू व्हीलर) पेट्रोल वाहने रस्त्यावर येत आहेत. तर दररोज १६ (फोर व्हीलर आणि टू व्हीलर) नवीन ई-वाहने रस्त्यावर दाखल होत आहेत. नव्या वाहनांमध्ये सर्वाधिक संख्या ही दुचाकींचीच आहे. कोरोनानंतर नव्या वाहनांची खरेदी काही प्रमाणात घटली होती. मात्र, आता वर्षभरातील नव्या वाहनांनी कोरोनापूर्वीचा आकडा गाठला आहे.

कोरोनापूर्वी जिल्ह्यात महिन्याला ७ हजार ते ८ हजार आणि वर्षाला ८० हजार ते ९० हजारांच्या घरात नव्या वाहनांची भर पडत होती. कोरोनानंतर मात्र यात घट झाली. दोन वर्षांत ६५ हजारांच्या घरात नव्या वाहनांची वाढ झाली. १० हजार ते १५ हजारांनी नव्या वाहनांच्या संख्येत घट झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा नव्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनानंतर आता ई-वाहनांच्या खरेदीकडेही नागरिकांचा ओढा वाढत आहे.

नव्या वाहनांत दुचाकी ‘नंबर वन’नव्या वाहनांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे दुचाकींचे आहे. वर्षभरात तब्बल ५५ हजारांवर नव्या दुचाकी रस्त्यावर आल्या. त्याशिवाय गेल्या वर्षभरात ई-दुचाकी खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. वर्षभरात तब्बल ५ हजारांवर ई-दुचाकी रस्त्यावर आल्या. पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल चार चाकी खरेदीचे प्रमाण निम्मे आहे.

२०२२-२३ मध्ये कोणती वाहने किती वाढली?- दुचाकी - ५५,१९३- ई-दुचाकी - ५,४३१- पेट्रोल कार - ५,४५६- डिझेल कार - २,९४६- ई-चार चाकी - २०२- पेट्रोल/सीएनजी कार - १,६०६- पेट्रोल / एलपीजी कार - ७- पेट्रोल हायब्रिड - ५६२

जिल्ह्यातील एकूण ई-वाहनेदुचाकी - ८,२३३चार चाकी - ४९६प्रवासी रिक्षा - ३८मालवाहू रिक्षा -२७८

जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या - १६ लाख ७० हजार ११०अशी वाढली वाहनेआर्थिक वर्ष - नवीन वाहने- २०१८-१९ : ९१,८७४- २०१९-२० : ८२,८२६- २०२०-२१ : ६०,२४२- २०२१-२२ : ६५,०५१- २०२२-२३ : ८२,५२९

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरRto officeआरटीओ ऑफीस