शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अपहरणकर्त्यांचा चार दिवसांत पर्दाफाश; पाटोदा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 18:28 IST

तालुक्यातील पाचंग्री येथील एका व्यक्तीचे घरासमोरून सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना पाटोदा पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन सिनेस्टाईल पध्दतीनेच जेरबंद केले.

पाटोदा (बीड ) : तालुक्यातील पाचंग्री येथील एका व्यक्तीचे घरासमोरून सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना पाटोदा पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन सिनेस्टाईल पध्दतीनेच जेरबंद केले. तब्बल चार दिवसांच्या अथक परिश्रमातून अपहृत व्यक्तीची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यापैकी एक लष्करी जवान, तर एक सेवानिवृत्त जवान आहे. सुरेश भैरु  साळवी (रा. ताम्हणगाव, ता. कागल, जि कोल्हापूर), विजय दत्तात्रय साळुंखे (रा. चौरे, ता. कराड, जि सातारा) आणि अभिजित शिवजी चव्हाण (रा. मादयाळ, ता. कागल, जि कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना वाहनासह (एमएच-१४, एव्ही- ६४५०) अपहृत सुनील बागलसह कोल्हापूर जिल्ह्यात ताब्यात घेतले. आरोपीमधील साळवे हा सेवानिवृत्त लष्करी जवान आहे तर साळुंखे हा सेवारत जवान आहे .

१० मे रोजी सकाळी साडेसात  वाजता सुनील अंकुश बागल यांचे राहत्या घरासमोरून अपहरण करण्यात आले होते.  यासाठी १०-१५ जणांसह तीन वाहनांचा वापर करण्यात आला होता. सुनीलची पत्नी आरती यांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

केवळ कोल्हापूरच्या लोकांनी अपहरण केल्याची माहिती पोलिसांकडे होती. आरोपींची ठोस माहिती हाती नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. शिवाय सुनील यांचा काही घातपात तर होणार नाही ना, अशी शंका होती. आष्टीचे उपअधीक्षक डॉ अभिजित पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून सहायक निरीक्षक संजय सहाणे यांच्या नेतृत्वात पथक नियुक्त केले. 

सहाणे यांनी राम बारगजे सहायक उपनिरीक्षक विष्णू जायभाय, विजय जगताप, लहू घरत, सुभाष क्षीरसागर या पथकासह तुटपुंज्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटक राज्याच्या सीमेवर हे लोक असल्याचे लक्षात आले. आजरा पोलीस ठाण्याच्या उत्तूर चौकी अंतर्गत होनाली गाव परिसरात असल्याची खात्री झाली. तेथे आरोपींना  सुनीलसह पोलिसांनी ताब्यात घेतले .साहणे यांच्या पथकाला कोल्हापूर पोलिसांची मोठी मदत मिळाली. आरोपी सातत्याने जागा बदलत होते. आरोपी कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गावचे असल्याने ते कर्नाटक राज्यात जाऊन भ्रमणध्वनीचा वापर करत होते. सुनील यास केवळ घरी बोलण्यासाठी भ्रमणध्वनीचा वापर करू देत होते .आरोपींच्या शोधासाठी सहाणे व पथकाने होनाळी गावाजवळ स्मशानभूमीत मुक्काम करून परिसरातच आरोपींना जेरबंद केले. 

नोकरीच्या आमिषाने फसवणूक अपहरण केलेली व्यक्ती सुनील बागल हा मूळचा पाचंग्री येतील रहिवासी आहे. तो पुण्याला बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतो, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तो या व्यवसायाच्या आडून तरु णांना पोलीस, सी आर पी एफ आदी ठिकाणी भरती करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळत होता. मागील पाच ते सात वर्षांपासून सुमारे ५२ उमेदवारांकडून बागल याने उपरोक्त आरोपींच्या माध्यमातून पैसे उकळले. या प्रकरणातून सुमारे दोन कोटी रुपतांचा चा व्यवहार झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले .त्यामधूनच हे अपहरण प्रकरण घडल्याचे सांगितले . 

टॅग्स :ArrestअटकKidnappingअपहरणBeed policeबीड पोलीस