शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हवालाच्या व्यवहारातून दिवसाढवळ्या व्यापाऱ्याची भोसकून हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:15 IST

शहरातील नगरखाना गल्ली भागात दिवसाढवळ्या झाली हत्या

औरंगाबाद: तोंडास रुमाल बांधून आलेल्या तीन ते चार जणांनी चाकूने भोसकून एका व्यापाऱ्याची हत्या केल्याची घटना शुक्रवारी शहरातील नगरखाना गल्ली भागात घडली. कमलेशभाई पटेल उर्फ प्रकाशभाई पटेल (रा .नगारखाना गल्ली ) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. भरवस्तीत दिवसा ढवळ्या झालेल्या या हत्येने शहरात खळबळ उडाली आहे. 

पटेल हे आजच गुजरातहून औरंगाबादेत आले होते. नगारखाना भागात त्यांचा कुरियर व्यवसाय होता. शुक्रवारी दुपारी पटेल यांच्या कुरियर ऑफिसमध्ये तोंडाला कपडा बांधलेली तीन हल्लेखोर घुसली. यातील एका हल्लेखोरांने रिव्होल्व्हर रोखताच पटेल यांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर हल्लेखोरांनी पटेल यांना पकडून त्यांच्यावर चाकूने वार केले. छातीवर गंभीर स्वरुपाची वार झाल्याने पटेल रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले.  यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. यावेळी पटेल रक्तबंबाळ अवस्थेतच जवळील नातेवाईकाच्या दुकानात गेले आणि तेथेच कोसळले. यानंतर त्यांना दिनेश पटेल यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सर्व  आरोपी एका गल्लीतून पळून गेले.

घटनेची  माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे. हल्लेखोर एकाच दुचाकीवर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलिसांनी याच्या आधारे तपास सुरु केला आहे. लूट मारीच्या उद्देशाने अथवा हवाला व्यवहारातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.