शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शांतता राहिली तरच व्यवसायवृद्धी; शहराच्या कायदा सुव्यवस्थेसाठी व्यापाऱ्यांचे पोलिसांना सहकार्य

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 9, 2023 20:03 IST

रेस्टॉरंट, बार, हॉटेलमालकांची पुन्हा होणार बैठक

छत्रपती संभाजीनगर : अचानकपणे पोलिस विभागाने शहरात रात्री ११ वाजता बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो लागूही केला. मात्र, याबद्दल व्यापारी संघटनांना विचारात घेतले नाही. थेट आदेश लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. ‘लोकमत’ने हा मुद्दा ऐरणीवर आणला होता. याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी लगेच गुरुवारी दुपारी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी पोलिस आयुक्तालयात तातडीने बैठक घेतली. शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली, तरच येथील व्यवसायाची वृद्धी होईल. या मुद्यावर व्यापारी प्रतिनिधींनी पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद हॉटेल्स असोसिएशन व जिल्हा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिशएनने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली. याविषयी येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले. पोलिस आयुक्तांनी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून आमचे म्हणणे ऐकून घेतले व सकारात्मक चर्चा झाली. यामुळे व्यापारी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले व ‘लोकमत’चे आभारही मानले.

जे शहर शांत असते, तिथेच व्यवसाय वाढतोजे शहर शांत असते, जिथे गुन्हेगारी कमी असते. त्याच शहरात पर्यटक येतात. तसेच शहराचा पैसा शहरात फिरला, तर शहराची वृद्धी होते, असे नाही; पण बाहेरील पैसा जेव्हा शहरात येतो तेव्हा त्या शहराचा विकास होतच असतो.

जिथे काही टपऱ्या मध्यरात्रीपर्यंत चालतात तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे यास रोखण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत बाजार बंदचा निर्णय पोलिसांनी घेतला, असे असेल तर पोलिसांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत.-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड काॅमर्स

पोलिसांना सहकार्य करूरात्री ११ वाजेपर्यंतच जर दुकाने बंद केलीत अन् शहरातील कायद्या सुव्यवस्था अबाधित राहत असेल, तर जिल्हा व्यापारी महासंघ पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे. कापड व्यावसायिक व अन्य व्यावसायिकांनी ११ वाजता दुकानाचे शटर खाली करावे व नंतर त्यांना दुकानात कपड्यांच्या घडी घालणे, दुकान स्वच्छतेचे काम करू द्यावे, १२ वाजेपर्यंत काम आटोपून ते व्यापारी- कर्मचारी घरी जातील, या मागणीस पोलिस आयुक्तांनी सकारात्मकपणे घेतले.

पुन्हा एकदा होणार बैठकपोलिस प्रशासनाला आम्ही नेहमीच सहकार्य करत आहोत व पुढेही करू; पण हॉटेल, रेस्टॉरंट, बार ॲण्ड परमिट रूम मध्यरात्री दीड वाजेपर्यंत चालू ठेवावेत, अशी मागणी आम्ही पोलिस आयुक्तांना केली. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊ. त्यात पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.-शिवाजी पाटील,अध्यक्ष, जिल्हा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन्स

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस