शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

चालक-वाहकाच्या हस्ते झाले बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाचे भूमिपूजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 18:30 IST

सिडको बसस्थानकाच्या जागी बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे झाले भूमिपूजन

ठळक मुद्देबसपोर्ट २४ महिन्यांतमध्यवर्ती बसस्थानक १८ महिन्यांत

औरंगाबाद : सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे भूमिपूजन आज चालक आणि वाहक महादेव गीते, सुदाम आधाने यांच्या हस्ते तर मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन वाहक नारायण शिंगाडे आणि त्यांच्या पत्नी गायत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती. 

पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादेतील सिडको बसस्थानकाच्या जागी बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन आज करण्यात आले. शहरात दशकभरापासून अद्ययावत बसस्थानकाची प्रतीक्षा आहे. मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. सध्या बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जवळपास ४.६ एकर जागेवर नवीन मध्यवर्ती बसस्थानक  उभारले जाणार आहे.पूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात बसपोर्ट उभारण्यात येणार होते. मात्र, खासगी भांडवलदार निविदा भरण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसटी महामंडळाने सिडको बसस्थानकावर बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्सफर-लीज’ तत्त्वावर आधुनिक बसपोर्टसह व्यापारी संकुल बांधून महामंडळास विनामूल्य हस्तांतर करण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा मागविण्याची वेळ आली. त्यासंदर्भात मुंबई येथे प्रक्रिया करण्यात आली. 

 

बसपोर्ट २४ महिन्यांतबसपोर्टचे काम सुरू झाल्यानंतर २४ महिन्यांत उभारणी करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. बसपोर्ट उभारणीसंदर्भातील सर्व प्रक्रिया मुंबई येथून करण्यात आली.

बसपोर्टमध्ये या सुविधाविमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. याठिकाणी बस प्लॅटफॉर्म, फूड कोर्ट, व्यापारी संकुल, चित्रपटगृह, वातानुकूलित विश्रामगृह आदी सुविधा राहतील. ‘डोम’ ही बसपोर्टची अद्वितीय ओळख राहणार आहे. हे डोम म्हणजे प्रतीक्षालय.

मध्यवर्ती बसस्थानक १८ महिन्यांतप्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर १८ महिन्यांत मध्यवर्ती बसस्थानकाची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. बसस्थानकाचा कंत्राटदार निश्चित झाला आहे. 

बसस्थानकात या सुविधा नव्या मध्यवर्ती बसस्थानकात २८ प्लॅटफ ार्म राहणार आहेत. याठिकाणी तिक ीट आरक्षण क ार्यालय, वाहतूक  नियंत्रण क ार्यालय, पार्सल कक्ष, महिलांसाठी हिरक णी क क्ष, शिवशाही, शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी वातानुकू लित क क्ष असतील. जेनेरिक  मेडिक ल स्टोअर्स, खुले उपाहारगृह, चित्रपटगृह आदी सोयीसुविधाही उभारण्याचे नियोजन आहे.

टॅग्स :Aurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानकDiwakar Raoteदिवाकर रावते