परभणी : दोन ते तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे फळबागांना फटका बसत आहे. जून महिना उलटला तरी पाऊस न पडल्याने विहीर व हातपंप कोरडेठाक पडल्याने जिल्ह्यातील फळबागा जळू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील बोटावर मोजणाऱ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, अशा प्रतिकूल परिस्थिीतही शेतकऱ्यांनी फळबागा जगविल्या होत्या. परंतु जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे मोसंबी, डाळिंब, केळी, पेरू आदी फळबागा पाण्याविना जळू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, अशा शेतकऱ्यांना आता शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र येथील जिल्हा प्रशासनाला याचे देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. मागील आठवड्यात मानवत तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्ज बाजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतरही जिल्हा प्रशासन म्हणावे तसे जागे झाले नाही. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेजिल्ह्यात बोटावर मोजण्याऐवढ्याच फळबागा उरल्या आहेत. त्याही निसर्गाच्या लहरीपणामुळे नेस्तनाबूत होत आहेत. शेतकऱ्यांनी हा फळबागा लहान मुलांसारख्या जगविल्या परंतु निसर्गासमोर शेतकरीही हतबल झाला आहे. जिल्ह्यातील फळबागा पाण्याविना जळून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. मोसंबी व डाळींब बागायदार शेतकरी डोक्यावर पाणी आणून बाग जगवित आहेत. तसेच काही शेतकरी टँकरद्वारे बागांना पाणी देत आहेत. प्रशासनाच्या वतीने फळबागा जगविण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे लाखोंच्या फळबागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
फळबागा जळाल्या
By admin | Updated: July 8, 2014 00:33 IST