शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

औरंगाबादला मंत्रीपदांची बंपर लॉटरी? शिंदे गटांच्या ५ तर भाजपाच्या तीन आमदारांची दावेदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:21 IST

जिल्ह्याला मिळणार नवीन पालकमंत्री, मंत्रीपदी कोणाला मिळणार संधी याचीच चर्चा

औरंगाबाद: शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले व बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्याचा कारभार आता नव्याने सुरू होणार आहे. शिंदेंच्या बंडाला बंपर पाठिंबा शिवसेनेचा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याने दिला. जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसह पाच आमदार या बंडात सामील असल्यामुळे औरंगाबादला मंत्रीपदाची बंपर लॉटरी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आ. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने यांच्यासोबत गेलेल्या सर्वच मंत्र्यांची पदे तशीच राहण्याची शक्यता अधिक आहे. आ. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदे कायम राहून आ. संजय शिरसाट यांना एखादे खाते मिळू शकते. तर आ. अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब यांना मंत्रिपदे मिळतील असा आत्मविश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. २०१९ मध्ये अवघ्या चार महिन्यांसाठी आ. सावे हे उद्याेग राज्यमंत्री राहिले होते. विधानसभेनंतर कॅबिनेट होण्याची त्यांची संधी हुकली होती, ती आता पूर्ण होऊ शकते. महाविकास आघाडी सरकारमध्ये भुमरे कॅबिनेट तर सत्तर राज्यमंत्री होते. शिंदे यांच्या बंडात अधिकाधिक आमदारांना सहभागी करून घेण्यात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची भूमिका महत्वाची होती. शिवाय तिसऱ्यांदा आमदार होऊनही मंत्रिपद न मिळाल्याने शिरसाट नाराज होते, अशी प्रशिपासूनच चर्चा होतीच. त्यामुळे शिरसाट यांच्या रूपाने तिसरे मंत्रिपद मिळू शकते. भाजपच्या कोट्यातून आणखी कोणाला मंत्रिपदे मिळतात यावर जिल्ह्यास किती मंत्रिपदे मिळतील, ते अवलंबून आहे. 

एका तपात झालेले पालकमंत्री असे२०११ ते २०१४ पर्यंत बाळासाहेब थोरात यांच्याकडे पालकमंत्री पद होते. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये रामदास कदम यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यातील गटबाजीमुळे डॉ. दीपक सावंत यांना पालकमंत्री करण्यात आले. सावंत यांचा कार्यकाल संपल्यानंतर सहा महिन्यांसाठी आ. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री राहिले. डिसेंबर २०१९ पासून २९ जूनपर्यंत सुभाष देसाई हे पालकमंत्री होते.

बाहेरचेच पालकमंत्री लाभलेआजवर जिल्ह्याला बाहेरचेच पालकमंत्री लाभलेले आहेत. मागील २५ वर्षांत चंद्रकांत खैरेवगळता सर्व पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातील राहिले. त्यामुळे औरंगाबादला राज्याच्या ‘टॉप टेन’ शहरात आणण्याच्या घोषणेला कुणीही पूर्ण करू शकले नाही. मागील १२ वर्षांत मुंबईतील चार पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले. बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस