शेतकरी संभ्रमात : पिठोरी अमावस्या दोन दिवसनरेंद्र जावरे परतवाडाशेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण असलेला पोळा बुधवार की गुरुवारचा, याबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. पंचांगानुसार पिठोरी अमावस्या संपल्यावर पोळा भरविता येत असल्याचे पंचांग तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बळीराजाचा सर्वात मोठा सण पोया असल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात त्याची तयारी केल्या जाते. वर्षभर शेतातील मशागतीचे कामे आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावीत करणाऱ्या बैलांची पूजा करणारा हा सण, त्याची आंघोळ, पूजा, सजावट आणि गोडधोड चारणाची प्रथा हिंदू संस्कृतीमध्ये आहे आणि ग्रामीण भागात सर्वाधिक शेतकरी असल्याने पोळा सणाचे महत्व अधिक आहे.दोन दिवस पिठोरी अमावश्यापिठोरी अमावशा आली की, पोळा सण साजरा करतात. यावर्षी पंचांगानुसार बुधवार ३१ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजून एक मिनिटांनी पिठोरी अमावशेला सुरुवात होणार असून गुरुवार १ सप्टेंबर रोजी २.३० वाजता संपणार आहे. परिणामी पोळा सण अमावस्या सुरु असताना साजरा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोळा सण साजरा करण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.बाजारपेठ सजलीपोळा सणासाठी परतवाडा शहरासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात बैलांना सजावटीचे साहित्यांची दुकाने लागली होती. रंग आणि सजावटीच्या सामानाची खरेदी शेतकरी करीत आहे. परतवाड्यात पोळ्याचा सर्वात मोठा बाजार भरला होता.बुधवारी पिठोरी अमावस्या सुरुवात होणार असून गुरुवारचा उगवता सूर्य तिला दिसणार आहे. त्यामुळे गुरुवारचा पोळा तर बुधवारी बैलाची आंघोळ पूजा करता येणार आहे. - अनंत देशपांडे,पंचांग तज्ज्ञ, परतवाडा
वेशीतून बैल काढण्याचा मान मातीच्या बैलाला
By admin | Updated: August 31, 2016 00:35 IST