परभणी : जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकरी गटांना खरीप हंगामात तब्बल ४० हजार मेट्रीक टन खत बांधावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र ५ लाख ३८ हजार २१० हेक्टर एवढे आहे. शेतकरी गटांना शेताच्या बांधावरच खत उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कृषी विभागाने उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात ४ हजार १८३ शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. या शेतकर्यांना बांधावर खत देण्यासाठी तब्बल ४० हजार मेट्रीक टन खत लागणार आहे. गतवर्षी खरीप हंगामात ३९ हजार २५५ मेट्रीक खत शेतकरी गटांना बांधावर वाटप करण्यात आले होते. यावर्षी ८०० मेट्रीक टन खत वाटपामध्ये वाढ झाली आहे. २०१३ खरीप हंगामामध्ये परभणी तालुक्यात बांधावर ७ हजार ४९० मेट्रीक टन खत वाटप करण्यात आले होते. पाथरी ५ हजार ७१ मे.टन, मानवत ३ हजार ९७४ मे.टन, सेलू २ हजार ४४८ मे.टन, जिंतूर ३ हजार २७० मे.टन, पूर्णा ६ हजार २९० मे.टन, पालम २ हजार ८११ मे.टन, सोनपेठ २ हजार ७०३ मे.टन व गंगाखेड तालुक्यात ५ हजार २०० मे.टन असे एकूण ३९ हजार २५५ मेट्रीक टन खत शेत बांधावर कृषी विभागाच्या वतीने वाटप करण्यात आले. कृषी विभागाच्या नियोजनामुळे शेतकर्यांचे मात्र होणार नाहीत. (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यात बियाणांची तब्बल १ हजार २८० दुकाने आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. तालुकानिहाय दुकाने पुढीलप्रमाणे- परभणी- ३३७, पूर्णा १०९, जिंतूर १८७, पाथरी १२१,मानवत १०७, सेलू १२१, गंगाखेड १३३, पालम ८८ व सोनपेठ ७७ असे एकूण १ हजार २८० बियाणे विक्रेत्यांची दुकाने आहेत. कीटकनाशकांची १ हजार ६७ दुकाने परभणी जिल्ह्यात कीटकनाशकांची १ हजार ६७ दुकाने आहेत. तालुकानिहाय दुकाने पुढीलप्रमाणे- परभणी- २८०, पूर्णा ९४, जिंतूर १४०, पाथरी १०१,मानवत ९८, सेलू १०५, गंगाखेड ११०, पालम ७७ व सोनपेठ ६२ असे एकूण १ हजार ६७ कीटकनाशकांची दुकाने आहेत.
४० हजार मेट्रीक टन खत बांधावर
By admin | Updated: May 15, 2014 00:16 IST