शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बजेट कोलमडले ! निवडणुकीच्या धामधुमीत महागाईचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:15 IST

राजकारणी प्रचारात व्यस्त, तर सर्वसामान्यांची महागाईने होरपळ

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंचे दर ४० टक्क्यांपर्यंत वधारले सरकार व प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त तर दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, साबुदाणा महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.  

देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. सरकार व प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. यामुळे  महागाई नियंत्रणात आणण्यात कुणाकडे वेळ नाही. परिणामी बाजारात जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची दरवाढ सुरूच आहे. मागील तीन महिन्यांत तूर डाळीच्या भावात किलोमागे ९ रुपयांनी वाढ होऊन ७४ ते ७५ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ  ६ ते ८ रुपयांनी वधारून ५८ ते ६० रुपये, मठ डाळ १२ रुपयांनी वाढून ८२ ते ८४ रुपये, मूग व उडीद डाळीत २ रुपयांनी वाढ होऊन अनुक्रमे ७६ ते ७८ रुपये तर ६२ ते ६४ रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. जानेवारीत २६ ते २८ रुपये विक्री होणारी ज्वारी सध्या ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. तर १८ ते २० रुपयांनी मिळणारी बाजरी २४ ते २६ रुपये किलोने विकत आहे.

या दरवाढीनंतरही बाजरी बाजारात कमी उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तांदूळ क्विंटलमागे दोन ते अडीच रुपयांनी महागून २८ ते ११२ रुपये किलोपर्यंत विकत आहेत. खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने मूग व उडदाचा पेरा कमालीचा घटला होता. तुरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला होता. पाण्याअभावी रबीत गहू, ज्वारी, हरभऱ्याचा पेराही कमीच झाला होता. गव्हाची मध्यप्रदेश व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने गव्हात जास्त परिणाम दिसून आला नाही.   

नियंत्रण कुणाचे?राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना नागरिकांच्या दु:खावर फुंकर घालायला कोणी नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019InflationमहागाईAurangabadऔरंगाबाद