शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : औरंगाबादच्या १,५०० लघु उद्योगांना मिळणार कॉर्पाेरेट कर सवलीतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:51 IST

शहरालगतच्या वाळूज, रेल्वेस्टेशन, चितेगाव, शेंद्रा, चिकलठाणा येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अर्थसंकल्पामुळे नवसंजीवनी प्राप्त होण्याचा दावा केला जात आहे. या उद्योगांना २५ टक्के कॉर्पाेरेट करामध्ये सवलत दिल्याने उद्योगांना वार्षिक नफ्यात थेट लाभ होण्याचे संकेत आहेत.

औरंगाबाद : शहरालगतच्या वाळूज, रेल्वेस्टेशन, चितेगाव, शेंद्रा, चिकलठाणा येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अर्थसंकल्पामुळे नवसंजीवनी प्राप्त होण्याचा दावा केला जात आहे. या उद्योगांना २५ टक्के कॉर्पाेरेट करामध्ये सवलत दिल्याने उद्योगांना वार्षिक नफ्यात थेट लाभ होण्याचे संकेत आहेत. 

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील उद्योग सर्किटमध्ये ३० ते ४० हजार कोटींची वार्षिक उलाढाल होेते. यातील ४० टक्के उलाढाल ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधून होते. म्हणजेच १६ हजार कोटींची उलाढाल यातून होते. यातील ५० टक्के म्हणजेच ८ हजार कोटींची उलाढाल ही वार्षिक ५० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या उद्योगांतून होते. ५० कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांसाठी गतवर्षी ३० टक्के कॉर्पाेरेट कर सवलत होती, ती सवलत यावर्षी ५० ते २५० कोटी उलाढाल असलेल्या उद्योगांसाठी २५ टक्के करण्यात आल्याने गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला फायदा होईल, असे वाटते. 

उद्योजक प्रशांत देशपांडे म्हणाले, २०० कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगाचा १० टक्के वार्षिक नफा २० कोटींपर्यंत जातो. त्यावर २५ टक्के कॉर्पाेरेट कर सवलत दिल्यास ५ कोटी सवलतीमुळे वाचतील. ती रक्कम उद्योग विस्तारासाठी उद्योजक वापरण्याची शक्यता वाढेल. या निर्णयाचे चांगले परिणाम आगामी काळात दिसतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

१ हजार उद्योगांना लाभसूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रातील सुमारे १ हजार उद्योगांना अर्थसंकल्पातील सवलतींचा लाभ होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. १०० टक्के उलाढालीमध्ये ४० टक्के वाटा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा, तर ६० टक्के वाटा मोठ्या उद्योगांचा असतो. औरंगाबाद आणि जालना या भागातील इंडस्ट्रीयल सर्किटमध्ये १६ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांतून होते. त्यामुळे अर्थसंकल्पातील कर सवलतींमुळे हे उद्योग मोठ्या प्रमाणात भरारी घेतील, असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला. 

लघु उद्योजकांसाठी काहीही नाहीमसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक म्हणाले, या अर्थसंकल्पामध्ये लघु उद्योजकांसाठी काहीही नाही. सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योगांचा ३० टक्क्यांवरून २५ टक्के कर कपात करताना उद्योजकांची व्याख्या विचारात घेतलेली नाही. इंडस्ट्री, तंत्रज्ञान एमएसएईसाठी बुस्ट मिळण्याची  अपेक्षा होती. लघु उद्योजकांना प्रमोट करण्यासारखी कोणतीही तरतूद  नाही.  

अर्थसंकल्पाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया. - अर्थसंकल्पातील कर सवलतींमुळे हे उद्योग मोठ्या प्रमाणात भरारी घेतील, असा विश्वास.- सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योगांचा ३० टक्क्यांवरून २५ टक्के कर कपात करताना उद्योजकांची व्याख्या विचारात घेतलेली नाही.- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसंकल्पामुळे नवसंजीवनी प्राप्त होण्याचा दावा.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय