शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

'बुद्धांची सम्यक वाणी जगाला मान्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 01:31 IST

धम्म प्रचार आणि प्रसाराला औरंगाबाद येथून सुरुवात झाली असून, याचे साक्षीदार होण्याचा मान आम्हाला मिळाला आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मसिद्धी यांनी केले

- विजय सरवदेऔरंगाबाद : तथागत गौतम बुद्धांच्या जन्माने भारतभूमी पावन झाली आहे. बुद्धांची सम्यक वाणी केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जग स्वीकारत आहे. धम्म प्रचार आणि प्रसाराला औरंगाबाद येथून सुरुवात झाली असून, याचे साक्षीदार होण्याचा मान आम्हाला मिळाला आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मसिद्धी यांनी आज येथे केले.पल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवन परिसरातील डॉ. आंबेडकर स्टेडियमवर शुक्रवारी सायंकाळी तीनदिवसीय जागतिक धम्म परिषदेला सुरुवात झाली. स्टेडियमवर उभारण्यात आलेल्या भव्य धम्मपीठावर तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीसमोर महानायका डॉ. वरकगोडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी भदन्त सदानंद महास्थवीर होते.सायंकाळी ५.३० वाजता स्टेडियमवर भिक्खू संघाचे आगमन झाले तेव्हा उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्हेनिच कांबळे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. भिक्खू संघाने सामूहिक वंदना घेतली. यावेळी विविध १५ देशांतून आलेल्या भिक्खू संघाला समता सैनिक दलाकडून सलामी देण्यात आली.याप्रसंगी या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महानायका डॉ. वरकगोडा म्हणाले, जोपर्यंत आपल्या मनातून तृष्णेचा क्षय होणार नाही, तोपर्यंत दु:ख कमी होणार नाही. आज जगाला ज्या देशाने धम्मविचार दिला. त्याच देशातून हा धम्म लुप्त होत गेला. केवळ लेणी आणि काही भग्नावशेषांमधून येथे धम्म मोठ्या प्रमाणात होता, हे सिद्ध झाले. यापुढे धम्माच्या प्रसार व प्रचार करण्याची जबाबदारी तुमची आहे. भिक्खू संघाची आहे.चौका येथील भिक्खू ट्रेनिंग सेंटर जगातील सर्वात मोठे केंद्र ठरणार आहे. या लोकुत्तरा विहारातून हे महान कार्य होईल, असे आज दिसते. या जगाला बुद्धाच्या शिकवणीची गरज आहे. या महान कार्यासाठी, धम्म प्रशिक्षणासाठी मी आशीर्वाद देतो. डॉ. वरकगोडा यांच्या भाषणाचा मराठीतून अनुवाद आनंद महाथेरो यांनी केला. यावेळी विविध देशांतील बौद्ध भिक्खूंनी मनोगत व्यक्त केले.हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीजागतिक धम्म परिषदेसाठी जगभरातून आलेल्या भिक्खू संघावर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्हेनिच कांबळे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.नागसेनवन परिसरातील डॉ. आंबेडकर स्टेडियमवर आयोजित जागतिक धम्म परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीलंकेचे महानायक भदंत डॉ.वरकगोडा धम्मसिध्दी, अखिल भारतीय भिक्खु संघाचे संघनुशासक भन्ते सदानंद महास्थवीर, भदंत बोधिपालो महास्थवीर यांच्यासह विविध देशातील भिक्खूसंघ.