शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ, हा प्रभाग आहे लाखाने काय होणार? कोटी हवेत; आताच इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले!

By विकास राऊत | Updated: November 15, 2025 19:01 IST

सोशल मीडियात पोस्टचा धुमाकूळ: ११५ जण निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेद पणाला लावतील. मनपात जातील, नगरसेवक म्हणून मिरवतील, परंतु केलेच्या खर्चाची भरपाई कशी होणार, याचा देखील हिशेब काही जण लावू लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून टाकल्यानंतर आता चार वॉर्डांचा एक प्रभाग आणि कोट्यवधी खर्चाची आकडेमोड करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियातून धुमाकूळ घालू लागल्या आहेत. स्वयंघोषित तज्ज्ञ खर्चाचे समीकरण मांडू लागले असून, त्यामुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच पळाले आहे.

११५ जण निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेद पणाला लावतील. मनपात जातील, नगरसेवक म्हणून मिरवतील, परंतु केलेच्या खर्चाची भरपाई कशी होणार, याचा देखील हिशेब काही जण लावू लागले आहेत. सुमारे ५० हजार लोकसंख्येचा एक प्रभाग आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणे, मतदान करून घेण्यासाठी टीम उभी करणे, सुमारे ४० मतदान केंद्रे असतील, त्यासाठी पूर्ण व्यवस्था, प्रचार, खाणे-पिणे, नेत्यांपासून कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळणे, हा सगळा खेळ पाहता या मैदानात निष्ठावानांनी संधी कोण देणार, लाखांचा नव्हे तर कोटींचा खेळ असेल, असेही प्रश्न अनेकांनी सोशल मीडियातून उपस्थित केले. निवडून येण्यासाठी केलेला खर्च आणि नंतर धार्मिक कार्यक्रमांसाठी वर्गण्या, प्रभागातील सुख-दु:खांच्या कार्यक्रमांना हजेरी, सार्वजनिक उत्सव, संपर्क कार्यलयातील रोजचा खर्च निघाला नाही तर काय करायचे, यावरही अनेक जण व्यक्त होत आहेत.

सोशल मीडियातील रिॲक्शन....उमेदवाराचे कर्तृत्व नसेल, तर ३ कोटी रुपये लागतील, उमेदवाराचा संपर्क असेल आणि राजकीय पक्षाकडून मैदानात असेल, तर किमान १ कोटी तर निश्चित लागतील. ५० लाख जवळ असले तरी काही होणार नाही, काळा पैसा निवडणुकीमुळे बाहेर येईल. कार्यकर्ते फुकट काम करणार नाहीत. दहा वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे महागाईनुसार पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी सांभाळावी लागेल. काही प्रभागांमध्ये तर मतदारांपर्यंत कसे जायचे, त्याचा खर्च देखील ठरला आहे. अशा पोस्ट फिरत आहेत.

२०१५ पासून नाहीत निवडणुकामहापालिकेच्या निवडणुका २०१५ साली झाल्या होत्या. २०१५ च्या तुलनेत महागाई दर वाढल्यामुळे आयोगाने निवडणुकीचा खर्च देखील ४ वरून ११ लाख रुपये प्रत्येक उमेदवार असा वाढविल्याचे दिसते.

११ लाख रुपये खर्च मर्यादामहापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी एका उमेदवाराला ११ लाख रुपयांची मर्यादा निवडणूक आयोगाने ठरवून दिली आहे. महायुती, महाविकास आघाडी, इतर अपक्ष मिळून जेवढे उमेदवार उभे राहतील, त्यानुसार एका प्रभागातून अधिकृतरीत्या किती रक्कम बाहेर येईल, ते कळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar election costs soar, candidates face financial pressure.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's upcoming municipal elections spark cost concerns. Candidates worry about expenses reaching crores for campaigning, voter outreach, and maintaining party worker relations. Social media discussions highlight the financial strain, with predictions of needing crores, impacting even seasoned politicians.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरElectionनिवडणूक 2024