रमानगर येथील रहिवासी अनिल मगनराव सदाशिवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रवींद्र चराटे, आकाश चराटे (रा. नाशिक रोड), संतोष उमले (रा. बाळापूर, जि. अकोला) यांच्यासह तीन महिलांवर विश्वासघात करून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या फिर्यादीनुसार आरोपींनी अनिल सदाशिवे यांच्या मुलीसोबत विवाह करण्याचे ठरविले होते. साखरपुड्यातच हुंड्यापोटी २ लाख ११ हजार रुपये रोख आणि एक अंगठी देण्यात आली. त्यानंतर नवरीला नोकरी लावण्यासाठी १० लाख रुपये, एक एकवीस नखी जिवंत कासव, काळ्या रंगाचा लॅब्रो डॉग, एक गौतम बुद्धांची मूर्ती व समई अशी रोख रक्कम आणि वस्तुची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण करू शकत नसल्यामुळे मुलीच्या वडिलांनी ते लग्न मोडले व मुलाच्या नातेवाइकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आढाव करीत आहेत.
दहा लाखांच्या हुंड्यासाठी लग्न मोडले; वरासह सहा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:02 IST