शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रशिया-युक्रेन युध्दामुळे वीट उद्योग संकटात; स्टीलच्या भाववाढीने बांधकामांना स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 19:22 IST

Russia Ukrain War: पैठण येथील वीटभट्टीवर  पाच हजारा पेक्षा जास्त परप्रांतीय कामगार काम करतात

- संजय जाधवपैठण ( औरंगाबाद ): रशिया आणि युक्रेन (Russia Ukrain War) दरम्यान सुरू असलेल्या युध्दामुळे मोठी उलाढाल असलेल्या  पैठण शहरातील वीट उद्योगास फटका बसला आहे. गेल्या पंधरा दिवसात स्टीलचे भाव टनामागे १६ हजाराने वाढले असून सर्वसामान्याचे  बांधकाम बजेट यामुळे कोलमडले आहे. सुरू असलेली बांधकामे तूर्त  बंद करण्याचा निर्णय सध्या होत असल्याने वीटांची मागणी मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले आहे. (Brick industry in crisis due to Russia-Ukraine war) यामुळे वीट उद्योजक मात्र अडचणीत आला आहे. 

पैठण तालुक्यात गोदावरीच्या काठावर मोठ्या प्रमाणात वीटभट्टी उद्योग चालतो.पैठणची वीट टिकाऊ असल्याने औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, परभणी पर्यंत जाते. पैठण येथील वीटभट्टीवर  पाच हजारा पेक्षा जास्त परप्रांतीय कामगार काम करतात. यावरून शहरातील वीट उद्योगाची व्याप्ती लक्षात येते. दररोज लाखो विटांची विक्री येथून होते.  रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे  स्टील महागले असून, त्याचा परिणाम  बांधकाम व्यावसायिकांना सोसावा लागत असल्याचे समोर येत आहे.दोन्ही देशात युध्द सुरू होण्यापूर्वी ६५ हजार रुपये प्रति टन असलेला  स्टीलचा भाव  दि ८ मार्च रोजी ८१ हजार रूपये टन झाला होता. 

युध्द असेच सुरू राहिले तर स्टीलचे भाव आणखी वाढण्याचा अंदाज व्यापारी पवन लोहीया यांनी व्यक्त केला आहे. २०२० मध्ये स्टीलचा दर ४२ ते ४५ हजार रुपये टन होता. कोरोनामुळे स्टील उद्योगावर परिणाम झाल्याने  दर ६५ हजार रुपयापर्यंत पोहोचला. आता युध्दाच्या परिणामामुळे दर ८१ हजार झाला असून दोन वर्षात ९३% स्टीलचे भाव वाढले आहेत. पंधरा दिवसात १६ हजार रूपये भाववाढ झाल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांनी तूर्त बांधकाम थांबवले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विट व बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून बांधकाम मजुरांनाही झळ सोसावी लागत आहे. 

विटांचे भाव कडाडणार....विटा भाजण्यासाठी लागणाऱ्या कोळश्याचे दर दुपटीने वाढले आहेत. पाच ते सात हजार रूपये टनाने मिळणारा कोळसा आता १२ ते १३ हजार रूपये टनाने घ्यावा लागत आहे. यामुळे विटांचे भाव हजार ते पंधराशे रूपया पर्यंत वाढणार असल्याचे पैठण वीट उद्योग असोसिएशनने सांगितले. स्टीलसाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने युरोपीय देशातून आयात केला जातो. युध्द सुरू होण्याच्या आधीपासून तिकडून येणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाला आहे. त्याचा फटका  स्टील उद्योगाला बसला आहे.- पवन लोहीया, अध्यक्ष व्यापारी महासंघ, बांधकाम व्यावसायिक, पैठण. 

बांधकाम व्यवसाय ठप्प सध्या स्टीलचे भाव वाढल्याने बांधकाम व्यवसाय हळूहळू ठप्प पडत आहे. यामुळे वीटांची मागणी कमी होत आहे. दुसरीकडे कोळशाच्या भावात दुपटीने वाढ झाल्याने जुन्या भावात वीटा विकणे परवडत नाही.- पवन शिसोदे, संतोष धापटे, वीट उद्योजक, पैठण. 

स्टील दरात तारखेनिहाय झालेली वाढ.... 24 फेब्रुवारी              65000 रुपये टन 27 फेब्रुवारी              68000 रुपये टन 1 मार्च                      71000 रुपये टन 3 मार्च                      74000 रुपये टन 5 मार्च                      76000 रुपये टन 6 मार्च                      79000 रुपये टन 7 मार्च                      80000 रुपये टन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया