शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मापात पाप करून ग्राहक राजाच्या विश्वासाला तडा; ५२१ ठिकाणी तपासणी; ३१ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:05 IST

तपासणीत ४२४ प्रतिष्ठानांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३० लाख ८० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

छत्रपती संभाजीनगर : ग्राहकाला ‘राजा’ मानले जाते, मात्र बाजारपेठेत काही व्यावसायिक राजाच्याच विश्वासाला तडा देत आहेत. कमी वजनाची उत्पादने देणे, एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणे, असे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारांवर लगाम घालण्यासाठी मागील आर्थिक वर्षात वैध मापनशास्त्र विभागाने मोठ्या प्रमाणावर कारवाई करत ३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

५२१ व्यावसायिक ठिकाणी तपासणीमहाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत कार्यरत वैध मापनशास्त्र कार्यालयाने मागील आर्थिक वर्षात दुकान, हॉटेल, पेट्रोलपंप आदी ५२१ ठिकाणी तपासणी केली. या तपासणीत ४२४ प्रतिष्ठानांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३० लाख ८० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पेट्रोलमध्येही फसवणूक; ३ पंपांवर कारवाईलातूर येथील ३ पेट्रोलपंपांनी लिटरमागे २५ ते ३० टक्के कमी पेट्रोल व डिझेल दिल्याचे उघड झाले आहे. या पंपांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.तसेच, एमआरपीपेक्षा जास्त दराने पॅकबंद शीतपेय विकणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील २ दुकानदारांविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

विविध कारणांवरून दंड१) पॅकबंद वस्तूंवर उत्पादकाचा सविस्तर पत्ता नसणे.२) उत्पादन दिनांक व मुदत संपण्याची तारीख नमूद न करणे.३) मुदत संपलेली वजन-माप उपकरणे वापरणे.या प्रकारांवरूनही संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.

तक्रार करा, तुमचे नाव राहील गुप्तव्यापाऱ्यांकडून वजन किंवा मापात फसवणूक होत असल्यास ग्राहकांनी वैध मापनशास्त्र यंत्रणेकडे तक्रार करावी. तक्रारीवर ७ दिवसांत कारवाई होऊन ग्राहकाला माहिती दिली जाईल. तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर