शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या २५ कोटींच्या योजनांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:23 IST

अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची निवड करण्याबाबत तत्परता दाखविली नाही.

ठळक मुद्देजि.प. समाजकल्याण विभागाचा अधिकारी-पदाधिकाऱ्यांची अनास्था कारणीभूत

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागणार, याची कल्पना असतानादेखील जि.प. समाजकल्याण अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची निवड करण्याबाबत तत्परता दाखविली नाही. परिणामी, चालू आर्थिक वर्षामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे (दलित वस्ती सुधार योजना) या योजनेंतर्गत २५ कोटी २५ लाख ५५ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. 

जिल्हा परिषदेत ज्यांना योजनांची अंमलबजावणी करावी लागते, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यांना योजना राबविली किंवा नाही, याबद्दल कसलेही देणे-घेणे नाही. प्रशासन व्यवस्थेतील अशा विरोधाभासामुळे कोणतीही योजना तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे, अशी खंत प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, याची वर्षभरापासून चर्चा होती, असे असतानाही समाजकल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षात प्राप्त निधीचे वेळेच्या आत नियोजन केले नाही. विषय समितीला योजनांच्या लाभार्र्थींची निवड करण्याचे अधिकार आहेत.

समितीनेही योजनांचे पुनर्नियोजन करण्यामध्ये वेळ घालवला. त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड होऊ शकली नाही. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेसाठी पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्यात आला; परंतु गटविकास अधिकाऱ्यांकडून सदोष आराखडा तयार झाल्यामुळे समाजकल्याण आयुक्तांनी तो पहिल्यांना नामंजूर केला. त्रुटींच्या पूर्ततेनंतर तो मंजूर केला. यालाही बराच वेळ गेला. त्यामुळे यासाठी प्राप्त ३० कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यात ८ कोटी ६८ लाख ४८ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यंदा चालू आर्थिक वर्षात २१ कोटी ३१ लाख ६२ हजार रुपये अखर्चित राहिले आहेत. या निधीच्या खर्चासाठी दोन वर्षांची मुदत असली, तरी अखर्चित निधी दायित्वात जातो आणि पुढच्या वर्षी कमी तरतूद प्राप्त होते, यात जिल्हा परिषदेचे मोठे नुकसान आहे, असे बोलले जाते. 

अपंगांची घरकुल योजना लागली मार्गीसमाजकल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या उपकरातील ५ टक्के निधी अपंगांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो. जिल्हा परिषदेने अपंगांसाठी घरकुल योजना हाती घेतली असून, यंदा ७० अपंगांना प्रती घरकुल १ लाख २० रुपये याप्रमाणे ८४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, अनेक घरकुलांची कामे मार्गी लागली आहेत. समाजकल्याण विभागाच्या एकूण योजनांपैकी एकमेव अपंगांची ही योजना आचारसंहितेच्या कचाट्यातून सुटली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी