शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

औरंगाबादेतील एनएचएआय प्रकल्पांना अनुदानाअभावी ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:30 IST

जालना रोड, बीड बायपासच्या कामासाठी २७५ कोटींची घोषणा होऊन पाच महिने झाले आहेत

ठळक मुद्दे जालना रोड, बीड बायपासकडे दुर्लक्षअजिंठा रस्त्याचे काम रखडले

औरंगाबाद : जिल्ह्यातील नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) अंतर्गत सुरू असलेली कामे ठप्प पडली आहेत. जालना रोड, बीड बायपासच्या कामासाठी २७५ कोटींची घोषणा होऊन पाच महिने झाले आहेत, तर औरंगाबाद ते अजिंठामार्गे जळगाव या रस्त्याचे चौपदरीकरण निधीअभावी रखडले आहे. धुळे ते औरंगाबाद या एनएच २११ शिवाय कुठलेही काम सध्या सुरू नाही. औरंगाबाद ते पैठण डीपीआरचे काम बंद पडले आहे.

एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडीकडे वर्ग केलेली कामे गुलदस्त्यात आहेत. राज्य एनएचएआयच्या विभागाला तातडीने दिलेल्या निधीतून जालना रोडचे तात्पुरते मजबुतीकरण करण्यात येणार आहे. ते कामही अजून सुरू झालेले नाही, तर बीड बायपास चर्चेतून गायबच झाला आहे.  जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम सध्या बंद पडल्यासारखेच आहे. औरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी तीन टप्प्यात ८५० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. ऋत्विक एजन्सी या संस्थेकडे त्या कामाचे कंत्राट आहे.

चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने ते काम सध्या बंद ठेवले आहे. त्या रस्त्याचा केंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडे वाढीव निधीसाठी दिलेला प्रस्ताव पडून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नॅशनल हायवे विभागाच्या देखरेखीखाली त्या रस्त्याचे काम आहे. सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असली तरी अंतिम मंजुरी अजून दिलेली नाही. पहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली. ही तरतदू द्विपदरीकरणासाठी करण्यात आलेली आहे. चौपदरीकरणासाठी सध्या तरी तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. 

सुधारित घोषणेची, कार्यवाही नाहीजालना रोड आणि बीड बायपास या दोन्ही रस्त्यांसाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने २७५ कोटी निधी देण्याचे जाहीर केले. बीड बायपाससाठी १२५ कोटी रुपयांचा, तर जालना रोडसाठी १५० अशी २७५ कोटींची सुधारित घोषणा १ जून २०१८ रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. नोव्हेंबर २०१८ पर्यंत या कामाच्या निविदा निघतील, असा दावा सूत्रांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाCentral Governmentकेंद्र सरकार