शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

सावकारीचा नवा फंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 00:44 IST

जालना : अनधिकृत खाजगी सावकारीला चाप लावण्यासाठी शासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केल्यानंतर अनेकांनी कृषी सेवा केंद्राआडून सावकारीचा नवा फंडा सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनधिकृत खाजगी सावकारीला चाप लावण्यासाठी शासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केल्यानंतर अनेकांनी कृषी सेवा केंद्राआडून सावकारीचा नवा फंडा सुरू केला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीला कृषी केंद्रातून बी-बियाणे, खते, कृषी साहित्याची विक्री करायची आणि शेतकऱ्याचे पीक बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर व्याजासह दामदुप्पट रक्कम वसूल करायची या प्रकारामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सावकारीच्या दुष्टचक्रात अडकले आहेत.खाजगी सावकार व बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेने मागील तीन वर्षांत जिल्ह्यात १९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सावकारीवर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने मुंबई सावकारी अधिनियमानुसार मनमानी व्याज वसूल करणाऱ्या अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला. शेतकऱ्यांना सावकाराच्या दरात जाण्याची गरज पडू नये यासाठी बँकामधून पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले. मात्र, बँकांच्या जाचक अटी,कर्ज देताना होणाऱ्या विलंबामुळे बहुतांश शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळत नाही. अपात्रतेच्या नावाखाली बँका अनेक शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे टाळतात. परिणामी ऐन हंगामात हातात पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव सावकाराच्या दारात जावे लागते. सावकारी कारवाईपासून पळवाट शोधण्यासाठी काहींनी कृषी केंद्राच्या आडून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा नवा मार्ग शोधला आहे. जालना जिल्ह्यात सुमारे १८०० कृषीसेवा केंद्र असून, शेतकऱ्यांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे, सिंचन साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. रोख पैसे नसणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रावर अनेकदा कुठलीही पावती देत नाहीत. उधारीवर दिलेल्या कृषी साहित्याचे पैसे वसूल करताना शेतकऱ्यांकडून मूळ रकमेवर तीन ते पाच टक्के व्याज आकारणी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. तालुक्याची ठिकाणे व मोठ्या बाजार गावातील कृषीसेवा केंद्रावर हे प्रमाण अधिक असून, एका गावातील सुमारे १५० शेतकरी सावकारीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कृषी सेवा केंद्राआड होणाऱ्या व्याजबट्ट्याच्या या व्यवहाराची नोंद होत नाही. परिणामी माहिती असतानाही अशा सावकारीवर कायदेशीर अंकुश ठेवणे शक्य नसल्याचे अधिकारी सांगत आहेत.