शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

लिपिक महिलेकडून एक लाख रुपयांची खंडणी घेताना दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 21:39 IST

लिपिक महिलेला नोकरी घालविण्याची धमकी देऊन तिच्याकडून एक लाख रुपये खंडणी उकळणा-या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्याा सुमारास रंगेहात पकडले. ही कारवाई आरटीओ कार्यालयातील सहायक आरटीओ नखाते यांच्या कक्षात करण्यात आली.

औरंगाबाद: लिपिक महिलेला नोकरी घालविण्याची धमकी देऊन तिच्याकडून एक लाख रुपये खंडणी उकळणा-या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्याा सुमारास रंगेहात पकडले. ही कारवाई आरटीओ कार्यालयातील सहायक आरटीओ नखाते यांच्या कक्षात करण्यात आली.विनोद फुलचंद गंगवाल (५७,रा. मारवाडी गल्ली, वाळूज)आणि अरूण दगडू माडूकर(५४,रा. जालाननगर)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेचे वडिल २० वर्षापूर्वी अपघातात मरण पावले. यानंतर ती आरटीओ कार्यालयात लिपिकपदी नोकरीला लागली. आरोपी विनोद  हा आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करतो तर अरूण हा माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. शिवाय त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्यांनी तीन महिन्यापूर्वी तक्रारदार महिलेची भेट घेतली आणि आम्ही तुमच्यासंबंधी अनेक महत्वाची कागदपत्रे आमच्या हाती लागली आहे. त्या कागदपत्राच्या आधारे वरिष्ठांकडे तक्रार केल्यास तुझी नोकरी जाऊ शकते, अशी थेट धमकीच त्यांनी दिली.  तुला नोकरी टिकवायची असेल तर आम्हाला दोन लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असे ते म्हणाले.  सुरुवातीला काही दिवस त्यांच्या म्हणण्याकडे तक्रारदार यांनी दुर्लक्ष केले. मात्र गेल्या काही दिवसापासून पैसे देता अथवा तुमची तक्रार करू,अशा प्रकारे ते तक्रारदार यांना  ब्लॅकमेल करीत होते. एवढी रक्कम एकदाच देणे शक्य नसेल तर दोन टप्प्यात द्या, असे त्यांनी सांगितले. आरोपींच्या धमकीमुळे प्रचंड घाबरलेल्या तक्रारदार यांनी शेवटी गुन्हेशाखेकडे धाव घेतली.  पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ.दिपाली धाटे-घाडगे , सहायक आयुक्त रामेश्वर थोरात,निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहायक उप निरीक्षक नंदकुमार भंडारे, पोहेकॉ संतोष सोनवणे, फारूख देशमुख, विजयानंद गवळी, बनकर, पंडित, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे, लालखा पठाण, धर्मराज गायकवाड, नंदलाल चव्हाण, नवाब शेख, वीरेश बने, रेखा चांदे यांनी गुरूवारी दुपारी आरटीओ कार्यालय परिसरात सापळा रचला.  यावेळी आरोपी विनोद आणि अरूण यांनी तक्रारदार महिलेच्या कार्यालयात जाऊन लिपिक महिलेकडून  खंडणीचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेतले. यानंतर खंडणीच्या रक्कमेसह  गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.