शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गं्रथ अधिक काळ जगतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:08 IST

गं्रथ हजार वर्षांहून अधिक काळ जगत असल्याचे प्रतिपादन साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. के. डी. सोनकांबळे व डॉ. तोहर एच. पठाण संपादित डॉ. परशुराम गिमेकर यांच्यावर लिखित ‘कस्तुरी’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गं्रथ हजार वर्षांहून अधिक काळ जगत असल्याचे प्रतिपादन साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. के. डी. सोनकांबळे व डॉ. तोहर एच. पठाण संपादित डॉ. परशुराम गिमेकर यांच्यावर लिखित ‘कस्तुरी’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त केले.प्रा.फ.मुं. शिंदे हस्ते व प्रा.अविनाश डोळस यांच्या अध्यक्षतेखाली मजनू हिल येथील मौलाना आझाद संशोधन सभागृहात उपस्थितीत रविवारी गौरव गं्रथाचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी डॉ. सतीश बडवे, डॉ. गणेशराज सोनाळे, प्रा.डी.बी.जगत्पुरीया यांंच्यासह साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डोळस म्हणाले, गं्रथ हजार वर्षांहून अधिक जगतात. प्रत्येकाचे जगणे वेगळे असते. त्या जगण्याचे प्रश्न व शोधलेली उत्तरे वेगळी असतात. जगत असताना सांस्कृतिक संघर्ष असतो. त्याचेही वेगळे महत्त्व असते. त्याचे प्रतिबिंब गौरव गं्रथात, आत्मचरित्रात उमटत असते. कस्तुरी हा ग्रंथ १०० वर्षांहून अधिक काळ उपलब्ध राहील. गिमेकर यांच्यावरील गौरव ग्रंथात सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शिक्षणातून परिवर्तन होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक चळवळीचा आदर्श घेऊन अनेक जण परिवर्तनातून पुढे आले. गिमेकर यांनादेखील चळवळीच्या पार्श्वभूमी दृष्टी आली. साहित्य एका जातीचे होऊ नये, विशिष्ट जातीचे ब्रॅण्ड होऊ नये. याची काळजी घेतली जावी, असे सांगून डोळस यांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्यासह इतर साहित्यिकांचे दाखले दिले. याप्रसंगी प्रा. शिंदे यांनी गौरव ग्रंथाला शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक डॉ. सोनकांबळे, डॉ. पठाण यांनी केले. डॉ. सोनाळे, प्रा.जगत्पुरीया, डॉ. बडवे यांनी गौरव ग्रंथावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक