शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

बुकिंग होतेय फुल! रेल्वे, ट्रॅव्हल्सचे आरक्षण करा, नाही तर दिवाळीत गर्दीत प्रवासाची येईल वेळ

By संतोष हिरेमठ | Updated: October 14, 2023 17:26 IST

दिवाळीत ट्रॅव्हल्सची किमान १५ टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी अवघ्या महिनाभरावर आली असून, प्रकाशोत्सवाच्या या सणात गावी जाण्यासाठी अनेकांकडून रेल्वे, ट्रॅव्हल्सचे आरक्षण करणे सुरू झाले आहे. त्यामुळे दसरा ते दिवाळीदरम्यान रेल्वे, ट्रॅव्हल्सच्या आसनांची बुकिंग फुल्ल होत आहे.

नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त शहरात अनेकजण आले आहेत. दिवाळीसाठी हे सर्व जण गावी जातात. प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्यक्रम दिला जातो. ज्या मार्गावर रेल्वे नाही, त्यासाठी ट्रॅव्हल बसला प्राधान्य दिले जाते. ऐनवेळी प्रवासाचे नियोजन केले तर गर्दीतून आणि वेटिंगवर प्रवासाची वेळ ओढवते. शिवाय प्रवाशांच्या खिशाला कात्रीही बसू शकते. महिनाभरावर दिवाळी आली असल्याने अनेक प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करीत बुकिंगवर भर देणे सुरू केले आहे. ट्रॅव्हल्सच्या २० टक्के जागांची बुकिंग महिनाभरआधीच दसरा ते दिवाळी सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीदरम्यान शहरातील १५२ ट्रॅव्हल्समधील साडेचार हजार सीटपैकी २० टक्के जागांची बुकिंग झाली आहे.

दिवाळीत किमान १५ टक्के भाडेवाढदिवाळीत ट्रॅव्हल्सची किमान १५ टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. आजघडीला पुण्यासाठी ६०० रुपये तर मुंबईसाठी जवळपास १४०० रुपये तिकीट आहे. मात्र, ऐन दिवाळीत पुण्याचे तिकीट ८०० रुपये तर मुंबईचे १७०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातून धावतात ३०० ट्रॅव्हल्सशहरातून नागपूर, मुंबई, यवतमाळ, चंद्रपूर, पुणे, अमरावती, अहमदाबाद, सूरत, हैदराबाद इ. शहरांसाठी दररोज जवळपास १५२ ट्रॅव्हल्स धावतात. छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या इतर शहरातील ट्रॅव्हल्सची संख्याही दीडशेच्या घरात आहे.

दिवाळीत एकेरी मार्गावरच गर्दीदिवाळीत प्रवाशांची एकेरी मार्गावर गर्दी असते. परतीच्या प्रवासात प्रवासी नसतात. इंधन खर्च निघावा म्हणून काहीसे भाडे अधिक असते. वर्षातील ८ महिने आम्ही ५० टक्के भाड्यावरच सेवा देतो. ‘एसटी’च्या तुलनेत दीडपड भाडे घेता येते. त्यापेक्षा अधिक भाडे आकारलेच जात नाही.- मोहन अमृतकर, बस ओनर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट वेल्फेअर असोसिएशन

टॅग्स :tourismपर्यटनDiwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबादticketतिकिट