शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता नियमित करून देणाऱ्या बोगस संस्थेला नागरिकांनीच पिटाळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:35 IST

‘लोकमत’ने दिली सर्वप्रथम बोगस संस्थेची बातमी

औरंगाबाद : सातारा- देवळाईतील मालमत्ता नियमित करून देण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने बुधवारी चक्क बाजार मांडला होता. या भागातील सजग नागरिकांनी बोगस संस्थेचा हा डाव हाणून पाडला. त्यामुळे या संस्थेला गाशा गुंडाळून काढता पाय घ्यावा लागला.

जटवाडा रोडवर या संस्थेने अनधिकृत बांधकामे नियमित करून देण्याचे नागरिकांना आश्वासन दिले. एका मालमत्ताधारकाकडून चक्कदहा हजार रुपये नोंदणी फी घेतली. नंतर मनपाचे कर्मचारी आल्यावर आणखी फी द्यावी लागेल, असेही सांगण्यात आले. एक मालमता नियमित करण्यासाठी साधारण ४० हजार रुपये खर्च येईल, असेही बोगस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. यासंदर्भात ‘लोकमत’कडे असंख्य नागरिकांनी विचारणा केली. ‘लोकमत’ने पडताळणी केली असता मनपा प्रशासनाकडून अशी कोणतीही संस्था नेमण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले होते. २० मार्चच्या अंकात ‘लोकमत’ बोगस संस्थांपासून नागरिकांनी अलर्ट राहावे, असे सांगितले होते. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सातारा-देवळाई भागात त्याच बोगस संस्थेने मालमत्ता नियमित करून देण्यासाठी शिबीर आयोजित केल्याची पत्रके वाटली. एका वाहनातून नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.  रेणुका माता कमानीपासून आत जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी बोगस संस्थेने टेंट लावून आपले दुकान सुरू केले. याचवेळी या भागातील नागरिकांनी मनपाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्यापासून वाचवा, सदरील शिबीर सुरू केलेल्या संस्थेची त्वरित हकालपट्टी करा, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी सतीश सांगुळे, सचिन कांबळे, सोमीनाथ शिराणे, रामेश्वर पेठारे, रणजित ढेपे, प्रदीप जाधव, रमेश बहुले, विजय कुठडे, समीर खेमणार, बाळू सांगुळे आदींची उपस्थिती होती. 

महापालिका अधिकारी घटनास्थळावर दाखल होण्यापूर्वीच बोगस संस्थेने गाशा गुंडाळून पळ काढला. फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने संस्थेने टेन्ट टेम्पोमध्ये भरून पळ काढला.

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSatara areaसातारा परिसर