शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत बोगस पटसंख्येद्वारे शाळांची बनवेगिरी; शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीत झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:11 IST

गंभीर स्वरूपाच्या अनियमितता शाळाभेटीदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांच्या नजरेस आल्या. 

ठळक मुद्दे शाळांकडून शासनाची फसवणूक स्पष्टयासंदर्भात एकेका शिक्षकाकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारपूस केली.

औरंगाबाद : बोगस विद्यार्थ्यांच्या आधारे वाढीव पटसंख्या दाखविणे, बोगस पटसंख्येच्या आधारे वाढीव शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल करणे, शाळेत न येणाऱ्या शिक्षकांना नियमित वेतन अदा करणे, आदी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता शाळाभेटीदरम्यानशिक्षणाधिकाऱ्यांच्या नजरेस आल्या. 

शनिवारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी काही शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी केली. तेव्हा खोकडपुरा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये हजेरी पटावर नमूद एकूण विद्यार्थी संख्येपेक्षा अनेक विद्यार्थी व शिक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले. या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, हजेरी पटावर एकूण १८२ विद्यार्थी आहेत. शनिवारी भेटीदरम्यान प्रत्यक्षात एकूण ५६ विद्यार्थीच उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. गैरहजर विद्यार्थ्यांबाबत शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी विचारणा केली असता एकाही शिक्षकाला त्यासंबंधी उत्तर देता आले नाही. सरलप्रणालीअंतर्गत शाळा व विद्यार्थ्यांना कोड नंबर देण्यात आलेले आहेत; परंतु नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक दिसून आला नाही. त्याामुळे अन्य शाळांतील विद्यार्थी अथवा विद्यार्थ्यांची काल्पनिक नावे हजेरीपटावर नोंदविण्यात आली असावीत, असा संशय शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे ३-४ शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव या शाळेने शिक्षण विभागात सादर केले आहेत. एक शिक्षिका स्वेच्छा निवृत्ती घेणार होती; परंतु तिला स्वेच्छा निवृत्तीपासून परावृत्त करून तिला घरी बसूनच वेतन अदा केले जाते. तब्बल वर्षभरापासून सदरील शिक्षिका शाळेतच आलेली नाही. यासंदर्भात एकेका शिक्षकाकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारपूस केली. त्यावेळी शिक्षक दडपणाखाली दिसून आले. काही वाच्यता करावी, तर दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाते. सेवाज्येष्ठता डावलली जाते. पदोन्नती नाकारली जाते, अशी कैफियत शिक्षकांनी मांडल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

दोषींविरुद्ध कारवाई करणारयासंदर्भात माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, हा अतिशय गंभीर प्रकार असून, बोगस पटसंख्येच्या आधारे शासकीय रकमेचा अपहार करणाऱ्या संस्था, मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. यासारखे प्रकार अनेक शाळांमध्ये असल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला असून, अचानक भेटी देऊन शासनाच्या रकमेचा अपहार करणाऱ्या शाळांचा भांडाफोड करणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :SchoolशाळाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र