शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

खदानीजवळ आढळला मृतदेह; ओळख पटविल्यानंतर मृताच्या वडिलांच्या आक्रोशाने सारे सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 12:24 IST

तरुणाचा डोक्यात दगड मारून निर्घृनपणे खून केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे

- संतोष उगले वाळूज महानगर :डोक्यात दगड मारून तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना वडगाव गट नंबर खदान परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या साईनगर सिडको ते वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर, खदानीलगत अंदाजे ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा रक्ताने माखलेल्या अवस्थेतील मृतदेह सकाळी सात वाजेच्या शिफ्टसाठी पायी जाणाऱ्या महिलांच्या निदर्शनास आला. घाबरलेल्या महिलांनी फोनकरून ही माहिती त्यांच्या पतीला दिली. बघता बघता माहिती सर्वत्र पसरल्याने सकाळी आठवाजेपर्यंत घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, फौजदार संदीप शिंदे विशेष शाखेचे योगेश शेळके, डिबी पथकाचे विलास वैष्णव आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. मारेकऱ्याने वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दगडाने ठेचून खून करत मृतदेह लगतच्या खदान परिसरात फेकून पळ काढला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. विशेष म्हणजे पोलिसांना घटनास्थाळावरून मयताच्या चप्पल जोड सोबत रक्ताने मखलेली मारेकऱ्याची चप्पल देखील आढळून आली. घटनास्थळी श्वानाला पाचरण करण्यात आले होते. श्वान लगतच्या दगडाच्या ढिगाऱ्या भोवती आणि नंतर मृतदेह परिसरातच घुटमळत होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

अखेर ओळख पटली, वडिलांचा आक्रोशमृतदेहाजवळ कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे किंवा मोबाईल आढळून आला नाही. यामुळे ओळख पटविण्यात अडचण आली. मृताच्या उजव्या हातावर 'आई' असे नाव गोंदलेले दिसून आले. पोलिसांनी सरपंच सुनील काळे व इतर स्थानिकांना बोलावून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. दरम्यान, मृताच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे मृताच्या वडिलांनी मुलाचा मृतदेह असल्याचे सांगत एकाच आक्रोश केला. मृताचे नाव शैलेश विठ्ठल दौंड असे असून तो बजाजनगर येथील रहिवासी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादWalujवाळूज