शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘देवगिरी’ जवळील नौकाविहार प्रकल्पाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:49 IST

देवगिरी किल्ल्यापासून जवळ असलेल्या मोमबत्ता तलावात नौकाविहार प्रकल्प सुरू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून प्राथमिक सुविधा निर्माण केल्या होत्या. आज त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. तथापि, ‘नौकाविहार’ सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने नव्याने प्रयत्न सुरू करावेत, या मागणीने जोर धरला आहे.

ठळक मुद्देमोमबत्ता तलाव : पर्यटनस्थळ विकासाबाबत जि. प. पदाधिकारी- प्रशासनाचा नाकर्तेपणा

विजय सरवदेऔरंगाबाद : देवगिरी किल्ल्यापासून जवळ असलेल्या मोमबत्ता तलावात नौकाविहार प्रकल्प सुरू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून प्राथमिक सुविधा निर्माण केल्या होत्या. आज त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. तथापि, ‘नौकाविहार’ सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने नव्याने प्रयत्न सुरू करावेत, या मागणीने जोर धरला आहे.चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत मोमबत्ता तलावाचे सुशोभीकरण व त्यामध्ये नौकाविहार प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मोमबत्ता तलावाच्या चारही बाजूंनी डोंगरदऱ्या आहेत. त्यामुळे या तलावात बारमाही मोठ्या प्रमाणात पाणी असते. या तलावाच्या पूर्वेकडील बाजूच्या पठारावर रिसॉर्ट तयार करून तलावात बोटिंग सुरू केली, तर हा लोकप्रिय स्पॉट होऊ शकतो. दौलताबाद, वेरूळ आणि खुलताबादकडे येणाºया पर्यटकांसाठी नौकाविहाराची मोठी पर्वणी ठरू शकते. यातून दौलताबाद ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात मोठी भर पडू शकते, या आशयाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार केला. तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी या प्रकल्पासाठी तात्क ाळ १ कोटी २५ लाख रुपये मंजूर केले. वर्षभरानंतर म्हणजे २२ मार्च २०१६ रोजी जि. प.च्या सर्वसाधारण सभेने त्यास मान्यता दिली. पण, ९-१० दिवसांत सव्वाकोटी कसे खर्च करायचे? असा प्रश्न निर्माण झाला.दरम्यान, पहिल्या वर्षात जिल्हा परिषदेने तलावाची संरक्षक भिंत व परिसरात तिकीटघर, कँटीन, पायºया, स्वच्छतागृह उभारण्याचे काम केले. या कामावर ५८ लाख रुपये खर्च करण्यात आला. जिल्हा परिषदेने बोटींच्या खरेदीसाठी शासनाकडे निधीच्या खर्चास परवानगी मागितली होती. पण, त्याला मान्यताच मिळाली नाही. तत्पूर्वी, प्रशासनाने बोटिंगसाठी निविदाही मागविल्या होत्या. सलग तीन वेळा निविदा मागवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. शेवटी अखर्चित राहिलेली रक्कम शासनाकडे परत करावी लागली.त्यानंतर जि. प. प्रशासनाने ‘बीओटी’ तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये एकाच एजन्सीकडून प्रतिसाद मिळाला. या एजन्सीकडून जिल्हा परिषदेला दर महिन्याला २१ हजार रुपये मिळणार होते. या एजन्सीकडून दोन मोटारबोट आणि पाच पॅडलबोट उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. परंतु डिसेंबर २०१७ च्या सर्वसाधारण सभेत सदरील एजन्सीवर शंका उपस्थित करण्यात आली. निविदा प्रक्रिया निकोप राबविण्यात आली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. एकमेव एजन्सीला कशी काय मान्यता देण्यात आली, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे हा पर्यायही अयशस्वी ठरला.चौकट ....झालेला खर्च वाया जाऊ देऊ नकायासंदर्भात स्थायी समिती सदस्य मधुकर वालतुरे यांनी या प्रकल्पाबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. मोमबत्ता तलावाचे सुशोभीकरण व पायाभूत सुविधांवर ५०-६० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. लवकरच या तलावात नौकाविहार सुरू करण्याबाबत नव्याने प्रयत्न करण्याबाबत प्रशासनाकडे आपण आग्रह धरणार आहोत, असे वालतुरे म्हणाले.-------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादboat clubबोट क्लब