शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

रक्तही अडकले महागाईच्या विळख्यात

By admin | Updated: July 19, 2014 00:45 IST

शिवराज बिचेवार, नांदेड जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला आता आयुष्याची दोरी बळकट करणारे दानातील रक्तही दुप्पट किमतीने खरेदी करावे लागणार आहे़

शिवराज बिचेवार, नांदेडजीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला आता आयुष्याची दोरी बळकट करणारे दानातील रक्तही दुप्पट किमतीने खरेदी करावे लागणार आहे़ पूर्वी शासकीय रक्तपेढ्यांमध्ये ४५० रुपये प्रतियुनिट मिळणाऱ्या रक्तासाठी आता १०५० तर खाजगीमध्ये ८५० रुपयांऐवजी तब्बल १४५० रुपये मोजावे लागणार आहेत़ त्यामुळे श्रेष्ठ दान असलेल्या रक्तालाही महागाई आली आहे़राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत गठीत केलेल्या १६ सदस्यीय समितीच्या सदस्यांनी केलेल्या शिफारशी रक्त संक्रमण परिषदेने मान्य केल्या आहेत़ त्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाने अध्यादेश काढून रक्ताच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ मृत्यूच्या दाढेत असलेल्या अनेकांना रक्ताची गरज भासते़ अशा रुग्णांना वेळेवर रक्त मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात़ रक्ताची ही गरज रक्तदानातून भागविली जाते़ त्यासाठी अनेक नागरिक, संस्था, पक्ष रक्तदान शिबिरे आयोजित करतात़, परंतु आता अशा दानातून मिळालेल्या अमूल्य रक्ताचेही मोल शासनाने वाढविले आहेत़ पूर्वी सामाजिक भान ठेवून रक्तपेढ्या उघडल्या जायच्या़ परंतु आता त्याकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे़ शासकीय रक्तपेढ्यांमध्ये ४५० तर खाजगीत ८५० रुपयांत रक्त मिळायचे़ आता तेवढी रक्कम फक्त रक्त तपासणीच्या नावाखाली उकळले जाते़ त्यातही रक्तातील वेगवेगळ्या घटकाचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत़ त्यात काही रक्तपेढ्यांकडून तर चक्क रक्ताच्या एक युनिटसाठी तब्बल ३ हजार रुपये उकळले जातात़ विशेष म्हणजे त्यासाठी रक्ताच्या वेगवेगळ्या तपासणीची नावे पुढे केली जातात़ जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाखांवर पोहोचली आहे़ अपघातग्रस्त, सिकलसेल, थॅलेसेमिया यासारख्या रुग्णांना दररोज रक्त लागते़ मोठ्या प्रमाणात रक्त संकलन सुरु असतानाही, रक्ताचा तुटवडा वारंवार जाणवतो़ नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेवून खाजगी ब्लड बँकाकडून त्यांची लुबाडणुक केली जाते़ त्यात आता जीवनदायी रक्ताच्या या वाढीव दराचा गोरगरीब रुग्णांना मोठा फटका बसणार हे निश्चित़ २० हजार युनिट रक्ताची गरजजिल्ह्याला दरवर्षी २० हजार ब्लड बॅगची आवश्यकता असते़ परंतु काही खाजगी ब्लड बँकांनी रक्ताचा अक्षरक्ष: बाजार मांडलाय़शासनाचे दर काहीही असले तरी, त्यांच्याकडून मात्र अव्वाच्या सव्वा दराची आकारणी करुन रुग्णांची अडवणूक केली जाते़ सेवाभाव म्हणून सुरु केलेल्या ब्लड बँकांनी सेवा सोडून मेवा खाण्याचे काम सुरु केले आहे़ या रुग्णांना मोफत रक्तराष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार सर्व रक्तपेढ्यांना थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल अ‍ॅनेमिया, इतर रक्ताशी निगडित आजार (ज्या आजारात रुग्णास जीवित राहण्यासाठी वारंवार रक्त संक्रमण करावे लागते, अशा आजाराचे बाधित रुग्ण) या सर्वांना मोफत रक्त देणे बंधनकारक आहे़ शहरातील रक्ता अन्य शहरालाही होतो पुरवठाशहरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन केले जाते़ यात शासकीय रुग्णालये, विविध संस्था, पक्ष संघटनाचा यांचा सहभाग असतो़ या शिबीरातून संकलित झालेले रक्त इतर शहरांमध्येही पाठविण्यात येते़