औरंगाबाद : घाटीतील विभागीय रक्तपेढीसाठी गेल्या वर्षभरात तब्बल १५ हजार दात्यांनी रक्तदान केले. वर्षभरात १८९ रक्तदान शिबिरातून हे रक्त संकलित झाले. यंदा ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त १ ते १६ आॅक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. अनिल जोशी, डॉ. शुभज्योती पोळे, डॉ. सुरेश गवई यांची उपस्थिती होती. आॅक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये रक्तदानाच्या माध्यमातून १५ हजार १४६ रक्तांचे युनिटस् जमा करण्यात आले. विभागीय रक्तपेढीने जमवलेल्या रक्ताच्या युनिटच्या माध्यमातून प्लाझ्मा, प्लेटलेटस्, पीसीव्ही असे २८ हजार ७६९ रक्तघटक तयार करण्यात आले. रक्तदानात ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण तब्बल ९४.८ टक्के (१४ हजार ३६३) इतके आहे. उर्वरित रक्तदान हे रक्ताची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेले आहे. रुग्णासाठी रक्त मिळविण्यासाठी स्वत:ही रक्तदान करणे, या भावनेतूनही रक्तदान होत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर, रॅली, रांगोळी, पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान, रक्तदान शिबीर संयोजकांचा मेळावा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे डॉ. अनिल जोशी यांनी सांगितले.------------
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वर्षभरात १५ हजार दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:24 IST
औरंगाबाद : घाटीतील विभागीय रक्तपेढीसाठी गेल्या वर्षभरात तब्बल १५ हजार दात्यांनी रक्तदान केले. वर्षभरात १८९ रक्तदान शिबिरातून हे रक्त ...
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वर्षभरात १५ हजार दात्यांचे रक्तदान
ठळक मुद्देविभागीय रक्तपेढी : ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त विविध कार्यक्रम