शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

‘एमआयएम’ची विरोधकांकडून नाकाबंदी

By admin | Updated: April 14, 2015 00:59 IST

औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- उल- मुस्लिमीन (एमआयएम) पक्षावर संकटाचे ढग दिवसेंदिवस आणखी गडद होत आहेत. काळे ढग अधूनमधून कधीही धो-धो बरसत आहेत

औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- उल- मुस्लिमीन (एमआयएम) पक्षावर संकटाचे ढग दिवसेंदिवस आणखी गडद होत आहेत. काळे ढग अधूनमधून कधीही धो-धो बरसत आहेत. अचानक गारांचा माराही होतो. त्यामुळे पक्ष डॅमेज कंट्रोलमधून बाहेर निघायलाच तयार नाही. पक्षाच्या दोन नेत्यांनी शहरात एकच जाहीर सभा घेतल्यावर सर्व काही आलबेल होईल, या आशेवर जगणारे पक्ष कार्यकर्ते आणि उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. कारण ऐतिहासिक आमखास मैदानावर आता ‘एमआयएम’ला जाहीर सभाच घेता येणार नाही.‘मोहोब्बत’ आणि ‘जंग’मध्ये सर्व काही चालते, असे बोलले जाते. महापालिका निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात ‘एमआयएम’ पक्ष पूर्णपणे चक्रव्यूहात सापडला आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये खा. असदोद्दीन ओवेसी आणि त्यांचे भाऊ अकबरोद्दीन ओवेसी यांनी दोन जाहीर सभा घेऊन मुस्लिम मतांमध्ये ‘इत्तेहाद’(एकता) घडवून आणली होती. अशीच काहीशी किमया महापालिका निवडणुकीमध्ये ओवेसी बंधू करतील या दृष्टीने पक्ष कामाला लागला आहे. शहरात ५४ वॉर्डांमध्ये एमआयएमने उमेदवार उभे केले आहेत. त्यातील अनेकांना तर ‘पतंग’ चिन्ह मिळालेच नाही. ऐनेवेळी ज्या उमेदवारांचे तिकीट कापण्यात आले ते ‘एमआयएम’ची ‘न भूतो न भविष्यती’ अशी घेराबंदी करीत आहेत.वॉर्ड क्र. ११ विश्वासनगर- हर्षनगरमधून एमआयएमकडून अगोदर अय्युब खान यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. एका रात्रीतून त्यांची उमेदवारी कापून जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी स्वत: या वॉर्डात आले. त्यामुळे अय्युब खान यांनी लगेचच काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली. आता कुरैशी आणि खान आमनेसामने लढत आहेत. ‘एमआयएम’ची कोंडी करण्यासाठी खान यांचे लहान भाऊ माजेद खान यांनी आमखास मैदान २० एप्रिलपर्यंत ‘आमखास प्रीमियर लीग’ घेण्यासाठी आरक्षित करून ठेवले आहे. त्यांनी पोलीस, महापालिका आणि विविध शासकीय कार्यालयांचे ना हरकत प्रमाणपत्रही घेतले आहे. ‘लोकमत’शी बोलताना माजेद खान यांनी सांगितले की, कोणाची कोंडी करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. क्रिकेट स्पर्धा आम्ही नेहमीच घेत असतो. यंदाही आम्ही १५ एप्रिलपासून स्पर्धा घेत आहोत.आमखास मैदान २० एप्रिलपर्यंत विरोधकांनी आरक्षित केल्याची कुणकुण ‘एमआयएम’च्या स्थानिक नेत्यांनाही लागली आहे. त्यांनी ओवेसी बंधूंच्या जाहीर सभेसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. अजूनपर्यंत मोठी आणि सुरक्षित जागा त्यांना मिळालेली नाही.