शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्यामागे देवदेवतांचे आशीर्वाद; विरोधकांची तर हिमालयात जाण्याचीही पात्रता नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:18 IST

चंद्रकांत खैरे यांचे विजयासाठी महादेवाला साकडे; नाव न घेता विरोधी उमेदवार संदीपान भुमरे यांच्या विधानाचा घेतला समाचार

खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): लोकसभा निवडणुकीची निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. यातच उमेदवारांनी जिंकून येण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहे. दुसरीकडे निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आज सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वेरूळ येथील प्रसिद्ध बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. 

लोकसभेचा निकाल माझ्याच बाजूला बाजूने यावा यासाठी महादेवाचे दर्शन घेऊन अभिषेक केल्याची माहिती खैरे यांनी दिली. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा संघटनमंत्री सतीश लोखंडे व माजी उपसभापती विजय भालेराव यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने खैरे यांचे स्वागत करण्यात आले. 

हिमालयात जाण्याची देखील विरोधकांची पात्रता नाहीयंदा संभाजीनगर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी जनता मला देऊ पाहत आहे.  मी गंगोत्रीपासून ते घृष्णेश्वरापर्यंत देवदर्शन करत आलेलो आहे. भगवान घृष्णेश्वराचा आशीर्वाद माझ्यासोबतच आहे. जे विरोधक मला हिमालयात पाठवण्याची भाषा करतात त्यांची हिमालयात जाण्याची देखील पात्रता नाही. त्यांचे दारूचे धंदे, गुंडगिरी, अवैध धंदे यातच ते मश्गूल आहेत, असा टोला संदिपान भुमरे यांचे नाव न घेता खैरे यांनी लगावला.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेaurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४