लोहा : अंधश्रद्धेतून गुप्तधनाच्या लालसेने आतापर्यंत शेकडोंहून अधिक नरबळी, पशुबळी देण्यात आले व पुढेही असा प्रकार सुरूच आहे. आरोपी सापडूनदेखील साटेलोटे करुन संबंधित प्रशासन आरोपीस पाठीशी घालत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.मागील १० ते १२ दिवसांपूर्वी लोहा शहरातील शिवाजी चौकालगत कासवाची तस्करी करणारी कार लोहा पोलिसांनी पकडली खरी मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. कासव असलेली एक स्कुल बॅग व कार चालकासह ताब्यात घेतली. चालकांकडून पोलिसांनी आरोपीची माहिती घेवून आरोपी मिळाल्याश्विाय सोडणार नसल्याची भूमिका घेताच पळून गेलेले आरोपी लोहा पोलिसांत येवून दाखल झाले. त्यांना ‘सुंदरी’चा प्रसाद देताच त्यांनी एकंदरीत घटनाक्रम पोलिसांना सांगितला. एका महाराजाला (बुवा) बारा नखी कासव गुप्तधनासाठी देवून त्यापोटी मोठी रक्कम मिळणार होती, अशी माहिती मिळाली. त्याच रात्री सदरील आरोपी व कार चालकास कारसह लाखोंच्या ‘तडजोडी’अंती सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे. सद्य:स्थितीस लोहा पोलिस ठाण्यात सहा पोलिस अधिकारी कर्तव्यावर असताना मटका, कलब, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध रेती वाहतूकसह इतर अवैध व्यवसाय तेजीत सुरू आहेत.(वार्ताहर)
कासवतस्करांना आशीर्वाद?
By admin | Updated: September 11, 2014 00:23 IST