शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

रेमडेसिविरचा काळाबाजार; औरंगाबादेत टोळी गजाआड, पाच इंजेक्शनसह सात जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 05:50 IST

पाच इंजेक्शनसह सात जण ताब्यात; जास्त दराने विकत होते इंजेक्शन

औरंंगाबाद : जालना येथील कोविड केअर सेंटरमधून रेमडेसिविर इंजेक्शन आणून त्याची औरंगाबादेत चढ्या दराने विक्री करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी पाच रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, कार असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनेश कान्हू नवगिरे (२८), साईनाथ अण्णा वाहूळ (३२), रवि रोहिदास डोंगरे तसेच संदीप सुखदेव रगडे (३२), प्रवीण शिवनाथ बोर्डे (२७), नरेंद्र मुरलीधर साबळे (३३) आणि अफरोज खान इकबाल खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. जमादार विशाल पाटील यांनी बनावट ग्राहक बनून टोळीचा मुख्य सूत्रधार दिनेश नवगिरे यास रेमडेसिविर इंजेक्शनसाठी फोन केला. इंजेक्शन देताना पथकाने दिनेशला पकडले.

चौकशीदरम्यान त्याने जालना येथील कोविड सेंटरमधील कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने जास्तीच्या दराने विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या सर्व साथीदारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ५ रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, कार असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

अकोेल्यात दोघांना पोलीस कोठडी

बिहाडे हॉस्पिटल तथा कोविड सेंटर येथील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. सोनल फ्रान्सिस मुजमुले व भाग्येश प्रभाकर राऊत अशी आरोपींची नावे असून त्यांना मंगळवारी न्यायालयाने १ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राम नगरातील एका मेडिकल स्टोअर्समधून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपी आशिष समाधान मते याला ताब्यात घेतले होते. त्याच्या माहितीवरून त्याच्या पाच साथीदारांना अटक करण्यात आली. या पाच आरोपींनी दिलेल्या माहितीवरून सोनल व भाग्येश या दोघांना सोमवारी अटक करण्यात आली. 

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरAurangabadऔरंगाबाद